Jalgaon

कोणत्याही प्रकारची औषधांची विक्री मेडीकल स्टोअर्स दुकानदारांनी डाँक्टरांच्या चिठ्ठी शिवाय करू नका. जिल्हाधिकारीअभिजित राऊत

कोणत्याही प्रकारची औषधांची विक्री मेडीकल स्टोअर्स दुकानदारांनी डाँक्टरांच्या चिठ्ठी शिवाय करू नका.
जिल्हाधिकारीअभिजित राऊत

रजनीकांत पाटील

जळगाव प्रतिनिधी :- जळगाव जिल्हयांतील सर्व औषध विक्रेते व जनतेस कळविण्यात येते की, सद्यस्थितीत कोरोना विषाणुचाप्रादुर्भाव जळगांव जिल्हयांत मोठया प्रमाणात होत असल्याचे दिसुन येत आहे. तसेच जिल्हयांत बरेचसे रुग्ण हे कोरोनासंसर्गाच्या अंतिम टप्प्यात रुग्णालयात दाखल होत असल्याचे आढळून आले आहे. कोरोना संसर्गात सर्दी, खोकला,ताप, Flu इ. लक्षणे प्रामुख्याने आढळुन येतात, अशा लक्षणाच्या आजारावरील औषधांची मागणी रुग्णाव्दारे डॉक्टरांच्याचिठ्ठीशिवाय करुन नये. अशा लक्षणाच्या आजारावरील औषधांचा पुरवठा डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय केल्यास रुग्ण हामुळ आजाराच्या उपचारापासुन वंचित राहु शकतो व त्यामुळे त्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.सदर बाब विचारात घेता, सर्दी, खोकला, ताप व Flu सारख्या आजारावरील कोणत्याही प्रकारच्या औषधाचीविक्री कुठल्याही परिस्थितीत डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय करण्यात येऊ नये, तरी सदरील सुचनेचे काटेकोरपणे पालनकरण्यात यावे. सदर बाबींचे उल्लंघन झाल्याचे आढळुन आल्यास संबंधितांवर कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईलयाची नोंद घ्यावी असे एका पत्रकाद्वारे जळगांव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कळविले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button