पंढरपुरातील गरीब व गरजू ब्राम्हण समाज बांधवांना मनसेची मदत
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर तालुक्यातील देवाची सेवा आणि पौरोहित्य करुन आपला चरिचार्थ चालवणारे अनेक ब्राम्हण कुटुंबे पंढरपुरात आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन महिन्यांपासून विठुरायाचे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे भाविक आता येत नाहीत. याबरोबरच विवाह, वास्तुशांती, मुंज,सत्यनारायण, पूजा असे अनेक धार्मिक कार्यक्रमही रद्द झाले आहेत. त्यामुळे पौराहित्य करणाऱ्या ब्रम्हणा समाजातील अनेक तरुणांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा गरीब व गरजू कुटुंबाना मदतीची गरज आहे. मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी अशा गरजू व गरीब ब्राम्हण समाजातील पौरोहित्य करणाऱ्या कुटुंबांना अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. ह.भ.प. मदन महाराज हरिदास व बाबा बडवे यांच्या उपस्थितीत मदतीचे वाटप केेले.
पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि येथील ब्राम्हण समाजाचे शतकानोशतकाचे नाते आहे. ब्राम्हण समाजातील अनेक लोक आजही विठुरायाची मनोभावे सेवा करतात.दरम्यान विठ्ठल मंदिर बडवे, उत्पात व सेवेकऱ्यांच्या ताब्यातून गेल्या पासून ब्राम्हण समाजातील अनेक कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यातच लाॅकडाऊन असल्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखीणच भर पडली आहे.दोन महिन्यापासून विठ्ठल मंदिर बंद आहे. त्यामुळे देवाची पूजा अर्चा करुन व देवाचे प्रासादिक वस्तूंची विक्री करुन आपला उदरनिर्वाह करणारी अशी अनेक कुटुंबे अडचणीत आली आहेत.
अशा वेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस या लोकांच्या मदतीसाठी धावून आले आहेत.
ब्राम्हण समाजातील गरीब व गरजू कुटुंबाना आज गहू,तांदुळ,साखर, , पोहे, आदीसंह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, नगरसेवक शैलेश बडवे,ऋशीकेश उत्पात, विवेक बेणारे, विद्याधर वांगीकर,महेश खिस्ते,ऋषीकेश पुणेकर,राजू पुरंदरे,गणेश पिंपळनेरकर महेश पवार, सागर घोडके,अर्जून जाधव आदी उपस्थित होेते.






