Kolhapur

आमदार ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांचा लोकराज्य जनता पार्टीमार्फत सत्कार

आमदार ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांचा लोकराज्य जनता पार्टीमार्फत सत्कार

सुभाष भोसले-कोल्हापूर
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत लोकराज्य जनता पार्टीने धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी टाळण्यासाठी व विकासाच्या मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. सर्वसामान्य माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू मानून लोकराज्य जनता पार्टीची स्थापना झाली . लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार ऋतुराज पाटील, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार चंद्रकांत जाधव व करवीरचे उमेदवार पी एन पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला होता . हे तीनही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी झाले . विजयी उमेदवार आमदार ऋतुराज पाटील तसेच आमदार चंद्रकांत जाधव यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण , शहराध्यक्ष सर्जेराव भोसले ,संघटक शशिकांत जाधव आदी मान्यवर.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button