Aurangabad

? धक्कादायक..हॉटेलमध्ये तलाठयाची गळफास लावून आत्महत्या,औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

? धक्कादायक..हॉटेलमध्ये तलाठयाची गळफास लावून आत्महत्या,औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : सिल्लोड शहराबाहेरील वळण रस्त्यावर असलेल्या हॉटेल पूजा येथे तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता.16) रोजी संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव कमान (ता.भोकरदन) सजेवर कार्यरत असलेले तलाठी दिनेश माणिकलाल जैस्वाल (वय 43,, रा.सिल्लोड (जि.औरंगाबाद) यांनी शहरालगत असलेल्या पूजा हॉटेल येथील तिसऱ्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button