Amalner:पर्यावरणपूरक गणपती स्पर्धेच्या विजेत्यांचे उद्या बक्षीस वितरण..!
अमळनेर नगरपरिषद अमळनेर जि. जळगाव माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अभियांनातर्गत अमळनेर नगरपरिषदेने पर्यावरण पुरक गणपती स्पर्धा आयोजीत केलेली होती. या स्पर्धेचे घरगुती व सार्वजनिक गणेश उत्सव स्पर्धा अश्या दोन गटात विभाजन करण्यात आलेले होते. पर्यावरण पुरक गणेश उत्सव स्पर्धेच्या अटीनुसार मंडळ व घरात पर्यावरण पुरक वस्तू पासून गणेशजीची मुर्ती स्थापन करणे बंधनकारक होते. तसेच स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकांनी माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण २०२२, प्लॉस्टीक बंदी या विषयांवर देखावे अथवा आरास सादर करणे, कचरा घंटा गाडीत टाकणे, प्लॉस्टीकचा वापर टाळणे तसेच सर्वात महत्वाचे किमान ५ झाले लावणे बंधनकारक होते.
या पर्यावरण पुरक घरगुती गणपती स्पर्धा स्पर्धेत शहरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिदास दिला. दि. ३१/०८/२०२२ ते ०५/०९/२०२२ या कालावधीत १०० + अधिक शहरातील नागरिकांनी नोंदणी केली.
नगरपरिषदे मार्फत प्राप्त अर्जाची छाननी व प्रत्यक्ष पाहणी करून शहरातील ३० उत्कृष्ट शाडू मातीच्या गणेश मुर्ती स्थापन करणा-या स्पर्धकाची निवड करण्यात आलेली होती. या तीस ही स्पर्धकांना अमळनेर नगरपरिषद मार्फ़त प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
या स्पर्धेतील १. ओम प्रमोद लटपते, २. हर्षिदा श्याम कंरदीकर, ३. प्रणिता अनिल चौधरी ४. नेहा संजय कुंभार ५. प्राचि चंद्रकांत महाजन यांना सर्वोकृष्ट ५ स्पर्धकांना माझी वसुंधरा अभियांना अंतर्गत अग्नी, जल, वायु, भुमी व आकाश या पंचतत्वांच्या नावाने रोख बक्षिसे, व प्रशस्तीपत्र देवून गौवरण्यात येणार आहे.
शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ ज्यांनी नागरिकांना स्वच्छते तसेच माझी वसुंधरा अभियान व पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती केली अश्या ३ मंडळांची निवड करण्यात आली. यात राजमुद्रा गणेश उत्सव मंडळ, प्रगती कोंचिंग क्लासेस, शिवराय मित्रमंडळ या मंडळांना बक्षिसे, व प्रशस्तीपत्र देवून गौवरण्यात येणार आहे.
नागरिकांना पर्यावरण व स्वच्छते विषयी जागृत करणे बाबत असा अनोखा उपक्रम अमळनेर नगरपरिषदे मार्फ़त श्री. प्रशांत सरोदे मुख्याधिकारी यांनी राबविला. यावेळी पर्यावरण संवर्धनासाठी संपूर्ण राज्यात ‘माझी वसुंधरा अभियान’ राबविण्यात येत असून या अंतर्गत नर्सरीची निर्मिती करणे, हिरवेगार क्षेत्र तयार करणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, पाण्याचे नियोजन करणे, अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर, हवेची
गुणवत्ता राखणे, आदी पर्यावरणपूरक कामे करणे आवश्यक आहेत. या उपकरणात शहरातील नागरिकांचे सर्वात अधिक योगदान व सहकार्य अपेक्षित आहे. असे मत व्यक्त केले. पारितोषिक वितरण व स्पर्धकांचा गौरव समारंभ दि. १४/०९/२०२२ रोजी सकाळी 10.30 वाजता अमळनेर नगरपरिषद सभागृहात ठेवला जाणार आहे.






