भाजपा कार्यकर्त्यांचे तहसीलदारांना निवेदन
चांदवड
प्रतिनिधी उदय वायकोळे
आज दि 20 जुलै रोजी चांदवड तहसीलदार यांना भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते यांनी निवेदन दिले त्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक कर्ज व दुध उत्पादकांना अनुदान मिळणेबाबत मागणी केली आहे.
आज महाराष्ट्रात शेतकरी वर्गाची अवस्था अतिशय बिकट असून ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिक कर्जाची नियमितपणे कर्ज फेड केलेली आहे . अशा शेतकऱ्यांना विविध विकास सोसायटी मार्फत पिक कर्ज आपणास मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे हे पुर्णपणे अन्याय करणारे आहे.याचा अर्थ असा होत आहे नियमितपणे ज्या शेतकऱ्यांनी कर्जफेड केली त्यांनी चुकी केली अस वाटत आहे . आज चांदवड तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला आहे . त्यामुळे सर्व पिक जोमात आहे . पिक वाढीच्या महत्वाच्या टप्यावर शेतकऱ्यांना युरीयाची टंचाई जाणवत आहे . त्वरीत तालुक्यात युरीया मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून द्यावा . अन्यथा कोणत्याही क्षणी भारतीय जनता पार्टी चांदवड तालुक्यात आक्रमक आंदोलन करेल या अगोदरही शासनास आपल्या माध्यमातुन खताविषयी निवेदन देण्यात आलेले आहे . तसेच दुधाला सरसकट १० रूपये प्रती लिटर व दुध पावडरला प्रती किलो ५० किलो अनुदान द्यावे तसेच लॉकडाऊन काळात घरगुती व व्यासायिकांचे वीज बिल माफ करण्यात यावे अशी विनंती केली आहे,या निवेदनावर मनोज जगन्नाथ शिंदे, भूषण कासलीवाल प्रथम नगराध्यक्ष चांदवड,मोहन शर्मा,सुनील शेलार,मुकेश आहेर,महेश खंदारे,काशीफ खान,बाळा पाडवी नितीन फंगाळ यांच्या निवेदनावर सह्या आहेत.






