Maharashtra

एरंडोल येथे महात्मा फुले हायस्कुल येथे आज आगळीवेगळी  रक्षाबंधन  साजरी ..!

विक्की खोकरे 
एरंडोल – महात्मा फुले हायस्कूल ,एरंडोल येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .सदर कार्यक्रमा प्रसंगी वृक्ष संवर्धनाची गरज, वृक्षांचे महत्व विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी झाडाला राखी बांधून वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली रक्षाबंधनानिमित्त विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला .सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक श्री .ए .एन .महाजन सर यांनी रक्षाबंधनाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले .
    सदर कार्यक्रमास श्री . एस . पी .माळी सर, श्री . डी .एन. चव्हाण सर ,श्री .सचिन महाजन सर,  श्री . जाधव सर ,श्री . एस डी .देशमुख सर, श्री .चौधरी सर, श्रीमती .आर .जे .महाजन मॅडम, श्रीमती एम .आर. गरुड मॅडम , श्रीमती आर .एम. कोळी मॅडम* व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button