Latur

मराठा सेवा संघ वैद्यकीय कक्ष प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. रमेश भराटे यांची निवड

मराठा सेवा संघ वैद्यकीय कक्ष प्रदेशाध्यक्ष पदी डॉ. रमेश भराटे यांची निवड

लक्ष्मण कांबळे

लातूर ( प्रतिनिधी ) लातूर येथील गायत्री सुपर
स्पेशालिटी हॉस्पिटल चे मुख्य संचालक डॉ. रमेश भराटे यांची मराठा सेवा संघ अंतर्गत तेहतीस कक्षा पैकी वैद्यकीय कक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष शिवश्री इंजि. विजय घोगरे यांनी शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधुन डॉ. रमेश भराटे यांची निवड केली आहे.
तसेच मराठा सेवा संघ अंतर्गत वैद्यकीय कक्षाची इतर राज्य कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. सरचिटणीस डॉ. अमरदिप गरड,कोषाध्यक्ष डॉ. अविनाश देशमुख, उपाध्यक्ष डॉ. कल्याण बरमदे, डॉ. आबासाहेब चव्हाण, प्रवक्ता डॉ. शेषेराव शिंदे, डॉ. अविनाश तांबारे, सहसचिव डॉ. सुधीर भिसे, डॉ. राकेश जाधव, डॉ. आनंद तनपुरे, राज्य प्रतिनिधी – डॉ. धनंजय पडवळ, डॉ. संजय गव्हाणे, डॉ. दिनकर बिराजदार, राज्य समन्वयक डॉ. अरुण मोरे, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. संतोष शिंदे, डॉ. मधुसूदन मगर, डॉ. उध्दव चव्हाण, डॉ. अनिल साखरे, डॉ.सचिन देशमुख, डॉ. बाळासाहेब जाधव डॉ. डी.एस. कदम, डॉ. संतोष बिराजदार, डॉ. यशवंत पवार,कायदेशीर सल्लागार अड.किरण जाधव, सल्लागार डॉ. गोपाळराव पाटील, डॉ. पी. आर. देशमुख, डॉ. बी. ओ. तायडे, डॉ. शिनगारे, डॉ.सुधीर देशमुख यांच्या सह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांची निवड केली आहे. या निवडीचे नूतन सर्व पदाधिकाऱ्यांचे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष शिवश्री कामाजी पवार, राष्ट्रीय सचिव कमलेश पटेल, प्रदेश अध्यक्ष इंजि. विजय घोगरे, कार्याध्यक्ष प्रा. अर्जुनराव तनपुरे, महासचिव मधुकर मेहेकरे, मराठवाडा अध्यक्ष लिंबराज बप्पा सूर्यवंशी आदी मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button