निंभोरा ग्रामपंचायत कुपनलिकेची केबल वायर चोरीला
निंभोरा ता:रावेर संदीप कोळी
निंभोरा ग्राम पंचायतीला पाणीपुरवठा करणाऱ्या बलवाडी गावातील पुरी भामलवाडी रस्त्यावरील ग्रामपंचायत पंप हाऊस वरीलवरून केबल वायर अज्ञात चोरट्यांनी कापून नेली .
सदरील प्रकार ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा कर्मचारी चंद्रकांत गवळी यांच्या लक्षात आला की बलवाडी गावाच्या बाहेर असलेल्या ठिकाणावरून अज्ञात भामट्यांनी केबल वायर कापून नेली असल्यामुळे निंभोरे गावाला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून संततधार पावसामुळे दुरुस्तीस ही विलंब होत आहे सदरील प्रकरणाचा तपास निंभोरा पोलिसांनी करावा या संदर्भात उशिरापर्यंत पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी वाढल्या आहेत गेल्या काही दिवसापासून चोरट्यांनी परिसरातील शेतकऱ्यांच्या केबल वायर चोरून नेले असून आता तर चक्क त्यांनी सार्वजनिक पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामपंचायतीची ही केबल वायर कापून दिली






