sawada

अवैध माती उत्खनन प्रकरणी,ट्रॅक्टर व जेसीबी जप्त

अवैध माती उत्खनन प्रकरणी,ट्रॅक्टर व जेसीबी जप्त
——————————————————-
स्थानिक कार्यक्षेत्रात अवैध वाळूवर कारवाई होणार कधी?

“सावदा तलाठी कार्यालयच्या अंतर्गत येणाऱ्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या होत असलेली वाळूची वाहतूक व शहरात अनेक ठिकाणी वाळूचे ढिग संदर्भात वृत्तपत्रात सतत बातम्या येत असूनही याकडे सावदा तलाठी व पथकाकडून दुर्लक्ष…आणि थेट तासखेडा-उदळी रस्त्यावर माती उत्खनन प्रकरणी त्यांनी तत्परतेने केलेली कारवाईवर आश्चर्य व्यक्त केले जात असून याकडे रावेर येथे नव्याने रुजू झालेले तहसीलदार बंडू कापसे यांनी लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ”
——————————————————–

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

सावदा :- रावेर तालुक्यात असलेल्या तासखेडा-उदळी रस्त्यावर अवैधरित्या मातीचे उत्खनन करून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या एका जेसीबी सह ट्रॅक्टरवर सावदा येथील तलाठ्यांनी कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली.या प्रकरणी चालक व मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की,रावेर तालुक्यातील तासखेडा उदळी रस्त्यावर शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका जेसीबीच्या मदतीने येथील मातीचे अवैधरित्या उत्खनन करून ट्रॅक्टर क्रमांक (एमएच१९ सीव्ही१३९६)मध्ये भरून वाहतूक करत असल्याची माहिती सावदा येथील तलाठी यांना मिळाली. त्यानुसार त्यांचे पथकाने रात्री १० वाजता कारवाई करत ट्रॅक्टर आणि जेसीबी ताब्यात घेऊन जेसीबी चालक प्रकाश अरुण कोळी (वय २४ रा.पुरी ता.रावेर)व ट्रॅक्टर चालक महेंद्र भागवत कोळी (रा.तांदलवाडी, ता.रावेर)सहीत दोन्ही वाहनांचा मालक किशोर नारायण चौधरी (वय ४८ रा.तांदलवाडी,ता.रावेर) यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडे माती वाहतुकीच्या परवान्यासंदर्भात विचारणा केली असता,तशी कुठलीही माहिती उपलब्ध नव्हती.त्यामुळे महसूल सदरील कर्मचाऱ्यांनी ट्रॅक्टर सह जेसीबी हे जप्त करून कारवाई केली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button