Nashik

आज ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित होणार आंतरजिल्हा झालेल्या शिक्षकांची बदली यादी…दोन वर्षाची प्रतिक्षा संपली

आज ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशित होणार आंतरजिल्हा झालेल्या शिक्षकांची बदली यादी…दोन वर्षाची प्रतिक्षा संपली

सुनिल घुमरे नासिक विभागीय प्रतिनिधी

करोडो रुपया चा भ्रष्टाचार थांबणार…शिक्षक सहकार संघटना च्या पाठपुराव्याला यश

हजारो शिक्षकांना मायभुमित जाण्याची संधी मिळणार आहे.गेल्या दिड ते दोन वर्षापासुन आंतर जिल्हा बदलीचा पाच टप्पा मार्गि लावण्यासाठी शिक्षक सहकार संघटना आग्रही होती.कोरोना च्या भयानंक संकटानंतर शिक्षकांना स्व जिल्ह्यात जाण्याची संधी मिळणार आहे.
शिक्षक सहकार संघटना ऑनलाईन बदल्या साठी आग्रही असणारी संघटना आहे…
दोन वर्षा पासून बहुप्रतीक्षित आंतरजिल्हा बदलीची ऑनलाईन प्रक्रिया पुर्ण होत असून आज सोमवारी ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते आंतर जिल्हा बदलीच्या याद्या प्रकाशीत होणार आहेत. 3943 शिक्षकांच्या पाचव्या टप्प्यात आंतर जिल्हा बदल्या झाल्या आसुन यात काम चालु असल्याने संख्या वाढण्याची शक्यता आहे.तसेच आंतर जिल्हा बदली झालेल्या लोकांना कार्यमुक्त कधी करावयाचे या बाबत ही मंत्री महोदय निर्णय घेणार आसल्याचे शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड यांनी सांगीतले.
तसेच जिल्हा अंतर्गत बदल्याही आंतर जिल्हा बदलीची प्रोसेस झाल्या नंतर होणार आहे.भ्रष्टाचार मुक्त शिक्षक बदली ही संकल्पनाच शिक्षक सहकार संघटनेने सर्वप्रथम मांडली. 2015 पासुन आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षक सहकार संघटना सातत्यपूर्ण व प्रभावी लढा देत आहे. अनेक आंदोलने, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक अभ्यासपुर्ण बैठका, संघटनेच्या नेत्यांनी व सहकाऱ्यांनी केल्या आहेत. त्याचेच फलित म्हणून ऑनलाईन बदली संदर्भात शासन निर्णय आले. तसेच पारदर्शक व भ्रष्टाचार मुक्त बदल्या झाल्या. जिल्हांतर्गत बदल्यासुद्धा पारदर्शक व एका क्लिकवर झाल्या. आजपर्यंत आंतरजिल्हा बदलीचे चार टप्पे झाले आसुन आंतरजिल्हा बदली च्या2017 मध्ये पहिल्या टप्प्यात 5500+ 2018 मध्ये दुस-या टप्प्यात 4500+ 2019मध्ये तिसऱ्या टप्प्यात 3600+ व 2020मध्ये चौथ्या टप्प्यात 1800+ बदल्या झाल्या. आत्तापर्यंत 13 हजाराच्या वर आंतर जिल्हा बदल्या झालेल्या आहेत.
पाचव्या टप्प्यात 3943 बदल्या होणार आहेत. आजपर्यंत या सर्व टप्प्यासाठी शिक्षक सहकार संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला आसुन आजपर्यंत
आपल्या कुटुंबापासून वर्षानुवर्ष दुर राहुन विद्यादानाचे व्रत पाळणारे शिक्षक बंधु भगिनी स्वताच्या जिल्ह्यात गेले. यासाठी शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड,शुभांगी चौधरी महिला राज्यध्यक्ष सचिव निलेश देशमुख,राज्य कार्याध्यक्ष दिप परचंडे, प्रसिध्दी प्रमुख गजानन देवकत्ते,नागपुर विभागीय अध्यक्ष रवि अंबुले, नाशिक अध्यक्ष अविनाश जुमडे,राज्य उपाध्यक्ष राहुल मसुरे,मनोज बनकर, मनोज कोरडे, कैलास चौहान, बसुळे व पदाधिकारी आदिंनी यासाठी प्रयत्न केले आहे.

*2022 मध्ये बदली झालेले शिक्षक संख्या जिल्हानिहाय पुढील प्रमाणे.*
अहमदनगर 88 ,अकोला 17,अमरावती 40,औरंगाबाद 170,
बीड 102,भंडारा 19,बुलडाणा 72,चंद्रपूर 102,धुळे 77,गडचिरोली 119,
गोंदिया 64, हिंगोली 91,जळगाव 115,जालना 189, कोल्हापूर 64,लातूर 18,नागपूर 11,नांदेड 74,नंदुरबार 130,नाशिक 129,उस्मानाबाद 35,पालघर 477,परभणी 84, पुणे 55,रायगड 248,रत्नागिरी 405,

*हजारो शिक्षकांना मायभुमित जाण्याची संधी मिळणार आहे.गेल्या दिड ते दोन वर्षापासुन आंतर जिल्हा बदलीचा पाच टप्पा मार्गि लावण्यासाठी शिक्षक सहकार संघटना अग्रही होती.कोरोना च्या भयानंक संकटानंतर शिक्षकांना स्व जिल्ह्यात जाण्याची संधी मिळणार आहे.*
*शिक्षक सहकार संघटना ऑनलाईन बदल्या साठी आग्रही असणारी संघटना आहे…*. -.

*श्री.अविनाश जुमडे विभागीय अध्यक्ष नाशिक विभाग,शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्य*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button