Maharashtra

अंधारी येथे नवतरुण क्रीडा मंडळ व युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेला सुरवात

अंधारी येथे नवतरुण क्रीडा मंडळ व युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेला सुरवात

अंधारी येथे नवतरुण क्रीडा मंडळ व युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवार आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेला सुरवात

चाळीसगाव प्रतिनिधी नितीन माळे
खेलो इंडिया – दौडो इंडिया अशी साद भारताचे लाडके प्रधानमंत्री मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांनी घातली. त्याच पावलावर पाऊल ठेवून अंधारी येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन नवतरुण क्रीडा मंडळ व युवानेते मंगेश चव्हाण मित्र परिवार यांनी केले. आज या कबड्डी स्पर्धेची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाची सुरुवात संत सेवालाल महाराज व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.
” गट-तट, जात-पात, पक्ष यांच्या पलीकडे जाऊन काम करण्याची माझी मानसिकता आहे. प्रत्यक्ष बोलण्यातून नव्हे तर कृतीतून सर्वसमावेशक असे काम उभे करायचे आहे. खेळाच्या माध्यमातून खेळाडूंचे लपलेले टॅलेंट बाहेर काढण्याचे काम आम्ही करत आहोत. सर्व सामान्य घरातून आलेली हिमा दास ही धावपटू एका महिन्यात 5 गोल्ड मेडल पटकवते, हि इथल्या मातीची ताकत आहे. तरुणाईने खेळाकडे अधिकाधिक वळले पाहिजे “, असे मत युवानेते मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केले .
यावेळी कार्यक्रमास युवानेते मंगेश चव्हाण, सरपंच तानाजी वाघ, पो.पा.शरद नागरे पाटील, ग्रा.स. बाळू पवार, ग्रा.स.साहेबराव कपूरचंद, ग्रा.स.प्रफुल्ल पाटील, ज्येष्ठ सदस्य बाळूनाना, रोहिणी गावाचे सरपंच अनिल नागरे, पत्रकार अनिल नागरे, भाऊ चव्हाण, माजी सरपंच पांडुरंग चव्हाण, धनराज रायसिंग, प्रभाकर चौधरी, भास्कर पाटील, खुशाल पाटील, , मनोज गोसावी, शांताराम पाटील, योगेश खंडेलवाल, नवनाथ राठोड, जोरसिंग चव्हाण, किरण राठोड, सुनिल राठोड, निंबा जाधव, भाऊसाहेब, विठ्ठल राठोड, गोकुळ राठोड, ज्येष्ठ नेते हनुमंत पवार, आकाश पवार, अनिल पवार, दशरथ पवार, श्याम राठोड, रामसिंग भाऊ, समाधान चव्हाण आदी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल साळुंखे यांनी केले व बहारदार असे सूत्रसंचालन व आभार रमेश चव्हाण यांनी मानले.  
#कबड्डी_स्पर्धा #अंधारी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button