Amalner

लाँकडाऊन काळात कर्जाचे हप्ते वसुल करणाऱ्या बँक व वित्तीय संस्था यांच्या वर कारवाई करा

लाँकडाऊन काळात कर्जाचे हप्ते वसुल करणाऱ्या बँक व वित्तीय संस्था यांच्या वर कारवाई करा मुस्लिम युथ सेवा फाउंडेशन ची मागणी

नूरखान

अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनच्या वतीने लाँकडाऊन काळात कर्जाचे हप्ते वसुल करणाऱ्या बँक व वित्तीय संस्था यांच्या वर कारवाई करणे बाबत लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

उपविभागीय अधिकारी उप विभाग अमळनेर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोरोना सारख्या आपत्ती मुळे पूर्ण देश होरपळतोय तरी दुसर्‍या बाजूला विविध प्रकारच्या कर्जदारकडून बँक व वित्तीय संस्था कर्जाची वसुलीचा तकादा लावून कर्ज भरण्याकरिता धमकत आहे वास्तविक रिझर्व बँकेने स्पष्ट निर्देश दिले आहेत की कोणत्याही कर्जाची वसुली करू नये कर्ज हप्त्याचे व्याज ही आकरू नये असे असताना बँक व विविध वित्तीय संस्थेची मनमानी मुजोरी ही अतिशय गंभीर बाब आहे महिला बचत गट सारख्या लहान कर्जदारांना उलट पक्षी आर्थिक मदतीची गरज आहे त्यांच्या कडून सुध्दा कर्ज वसुलीची तकादा लावलाजात आहे तालुक्यात कोणत्याही प्रकारची कर्ज वसुली होऊ नये असे आदेश आपण द्यावे कर्ज वसुली मुळे अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे कोणाचे जिवा चे काही कमी जास्त झालेल्यांने बँक व वित्तीय संस्था जवाबदार राहातील असा इशारा ही देण्यात आले व शासना पर्यंत हे मागणी पोहचवावी निवेदनावर मुस्लिम युथ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज शेख, फयाज पठाण कुरेशी, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, शराफत मिस्त्री, शेरखान पठान, खालीद शेख,सह आदि बांधवांचे स्वाक्षरी आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button