kannad

दर्पण दिनी पत्रकारांचा सन्मान..

दर्पण दिनी पत्रकारांचा सन्मान..

अमोल मोरस्कर कन्नड

पिशोर : येथील पत्रकारांचा बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दर्पण दिनी सत्कार करण्यात आला. पत्रकार हा वृत्तपत्राचा मूळ गाभा होय. वृत्तपत्रे हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ होय. या अनुषंगाने पत्रकाराच्या लेखणीला बळ मिळावे, ही योजना मनात योजून पिशोर येथे पिशोर, नाचनवेल व वासडी पंचक्रोशीतील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रोनिक मिडियामध्ये पत्रकार तथा वार्ताहर म्हणून काम पाहणाऱ्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

डॉ. संजय गायकवाड लिखित “छत्रपती संभाजी महाराज” हा ग्रंथ व पेन असे सत्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योगपती लक्ष्मणशेठ चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती पी पी निकम शेठ हे हजर होते.

याप्रसंगी नाना लहाने, प्रा मनोज मोकासे, दत्ता अण्णा मोरस्कर, संतोष पाटील व अरमान मदार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तर आभार डॉ. संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास फैयाज पठाण, आरेफ सय्यद, रविंद्र पिंपळे, ज्ञानेश्वर दवंगे, बापूसाहेब रामकर,अनिल सुरडकर,अमोल मोरस्कर, कारभारी हराळ, विजय थोरात, भागिनाथ मोकासे, मिलिंद लांडगे, शिवाजी नवले, सचीन खडके, निलेश रोडे, राजू गिरी, शैलेश वाघ उपस्थित होते.

Leave a Reply

Back to top button