Amalner: ॲड ललिताताई पाटील अमळनेर यांच्यामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार व अभिनंदन
भारतातील सर्वात कठीण जेईई मेन्स परीक्षेत कृष्णा गोविंद पाटील व नीट परीक्षेत कुमुद वसंत देसले व शिशिर अनिल पाटील यांनी दैदीप्यमान यश संपादन केल्याबद्दल त्यांचा गुणगौरव केला व अभिनंदन केले. पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी नीट व जेईई या परीक्षांसाठी जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेमार्फत गेल्या तीन वर्षापासून मार्गदर्शन केंद्र व फाउंडेशन कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. नीट व जेईई या परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी मोठ्या शहरांमध्ये जावे लागते व खूप फीज भरावी लागते त्यासाठी ॲड ललिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत कमी फीजमध्ये विद्यार्थ्यांसाठी जेईई व नीट मार्गदर्शन केंद्र चोपडा रोड येथे स्थापना केली आहे.भविष्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात कीर्तीवंत डॉक्टर्स व इंजिनियर्स व्हावेत यासाठी ॲड ललिता पाटील यांचा मानस आहे.






