sawada

सावदा गौसिया नगरातील अवघ्या ४ दिवसापूर्वी बांधण्यात आलेली नविन गटारीचा ५० फुट पेक्षा जास्त भाग कोसळून पडला! : लोकांमध्ये संताप. “विकासाच्या नावाखाली केले जात आहे भकास नवीन बांधकाम.”

सावदा गौसिया नगरातील अवघ्या ४ दिवसापूर्वी बांधण्यात आलेली नविन गटारीचा ५० फुट पेक्षा जास्त भाग कोसळून पडला! : लोकांमध्ये संताप. “विकासाच्या नावाखाली केले जात आहे भकास नवीन बांधकाम.”

युसूफ शाह सावदा

सावदा : जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे गेल्या दोन वर्षांपासून नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गौसिया नगरात १५ वर्षानंतर विकास म्हणून नवीन गटारी बांधण्यात येत असताना गेल्या चार बांधलेल्या नवीन गटारीचा जवळपास ५० फूट पेक्षा जास्तीचा एक भाग कोसळून पडलेल्या अवस्थेत दिसत आहे. यावरून सिद्ध होते की सदरील बांधकाम हे ठरलेल्या इस्टिमेटला थेट बगल देऊन निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. यामुळे येथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

सदरील परिसरात १५ वर्षानंतर पालिका प्रशासनच्या वतीने नवीन गटारी बांधण्यात येत आहे हे बघून येथील नागरिक आनंदी झाले होते. मात्र अवघ्या ४ दिवसापूर्वी सदरील नवीन गटारीचे बांधकाम पळल्याने नागरिक संतापा व्यक्त करीत आहे. तसेच गटारीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे केले जात असतील तर विकासाच्या नावाखाली शासनाकडून या भागात खर्च होत असलेला निधी थेट पाण्यात जातांना दिसत आहे. गटारी उत्तम दर्जेदार व टिकाऊ तयार व्हावे म्हणून शासनाने नियोजित केलेला इस्टिमेट ठेकेदाराकडून वाऱ्यावर ठेवून सदर गटारीच्या बांधकामात सरासरी ८ एम एम ची आसारी रिंग साठी व १० एम एम ची उभे बांधकामास सर्रास वापरली जात असल्याने अवघ्या चार दिवसापूर्वी बांधण्यात आलेल्या नवीन गटारीच्या ५० फूट पेक्षा जास्त भाग कोसळून पडून गेलेला आहे. सदर कामा ठिकाणी पालिकेतील बांधकाम विभागाच्या कोणताही संबंधित अधिकारी चौकशी व पाहणी करताना दिसत नाही. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी थेट पाण्यात जात आहे. म्हणून यासंबंधी जबाबदार निश्चित करून दोषींवर नियमाप्रमाणे कारवाई व्हावी सदरील गटारीचे काम टिकाऊ व दर्जेदार होऊन मिळावे तसेच या ठिकाणी सतत संबंधित पालिकेतील अधिकारी यांची नियुक्ती करण्यात यावी व त्यानुसार बांधकामाची पडताळणी करण्यात अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. तसेच लवकरच यासंबंधी सावदा पालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण व जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे काही जागरूक नागरिक तक्रार देखील दाखल करणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आलेली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button