? वाचा…आदिवासी आमदार सिथ्थाकाचा माओवादी ते आमदार असा प्रवास…प्रा जयश्री दाभाडेतेलंगणातील या आदिवासी #गोंड महिला आमदाराचे कोरोनातील कार्य अवश्य वाचा.. #धनश्री_अनुसया उर्फ ‘सिथ्थाका’-माओवादी ते आमदार असा प्रवासकोया आदिवासी समाजातील मुलगी खूप लहान वयातच माओवादी चळवळीत सक्रीय झाली. पुढे कमांडर पदावर तिला बढती मिळाली. ती जवळपास 11 वर्ष भूमिगत राहून माओवादी चळवळीत काम करत होती. 2004 मध्ये तिने आत्मसमर्पण केले तरी मुलुगु या आदिवासी क्षेत्रात तिचा चांगला प्रभाव होता हे ओळखून कॉंग्रेसने तिला प्रदेश सरचिटणीस पद दिले. 2009 मध्ये कॉंग्रेसने तिला आमदारकीचे तिकीट दिले. निवडणूक लढली आणि जिंकली. पुन्हा 2018 मध्ये तिला कॉंग्रेसने तिकीट दिले आणि ती जिंकली.
लॉकडाऊन चालू झाल्यापासून तेलंगणाच्या ह्या 48 वर्षीय आमदार रोज सकाळी 8 वाजल्यापासून 20-25 किमी चालत, रानावनातून मार्ग काढत, डोंगर दऱ्या पार करत, नद्यांमधून मार्ग काढत आपल्या कार्यक्षेत्रातील एकेक आदिवासीची झोपडी शोधून काढतात आणि तिथे अन्न, धान्य जरुरी वस्तूंचा पुरवठा करतात. त्यांना विचारले तुम्ही हे का करत आहात तर त्यांनी उत्तर दिले “जसा लॉकडाऊन लागला आहे तसा या लोकांकडे काम नाही, त्यामुळे यांच्याकडे राशन घेण्यास पुरेसा पैसा नाही. तेलंगना सरकारने श्वेत राशनधारकांना 12 किलो आणि 500 रुपये जाहीर केलेत. पण माझी ही लोकं यांच्याकडे कुठलेही कागद नाही, बँक खाती नाही. कसे देणार तुम्ही यांना पैसे? मग ते या सर्व लाभांपासून वंचित राहतात. यामुळे कुणालाही दोष न देता मी ठरवले की या महामारीत आपण स्वतःच आपल्या लोकांना मदत करावी.”
आज जेव्हा शहरातच राहणारे, भल्या भल्या गाड्या असणारे आमदार, खासदार, नगरसेवक, राजकीय नेते घरातून लॉकडाऊन मध्ये कसे राहावे, कसे वागावे यावर प्रवचन देत आहेत. जे मदत करत आहेत त्यांना नाव लिहून घेण्याची घाई आहे. काही मदतीच्या बहाण्याने आपला राजकीय प्रचार तिकीट लाऊन करत आहेत. त्यांच्या कार्यक्षेत्रात लोकांची अवस्था काय आहे हे जाणून घेण्यात त्यांना अजिबात रस नाही. अर्थात निवडणूक झाली म्हणजे तुम कोण और हम कोण करणारी अवलाद अश्या क्षणी वाऱ्यावरच सोडते.
ती एकेकाळी माओवादी जरी असली तरी तेव्हाही तिला आपल्या लोकांची काळजी होती. आजही तिला आपल्या लोकांची काळजी आहे. फक्त तिचा मार्ग बदलला आहे. दुर्दैवाने आपल्याला अशी लोक खूप कमी मिळतात. फक्त कोणत्याही मुद्दयावर राजकारण करण्यात आपला पुढाकार असतो. पण ग्राउंड लेवल काम अगदी शून्य! अन हे सर्वच पक्षाच्या लोकांना लागू होते.
सलाम सिथ्थाका जी आपणास, आपणाला आदिम स्वास्थ आणि दीर्घायुष्य लाभो याच कामना!






