रे रोड मुंबई येथून ९५००० मास्क जप्त
जप्त मुद्येमालात N95 व ३प्लाय मास्कचा समावेश
पी व्ही आनंद
मुंबई गुन्हे शाखा, युनिट ३ ची कामगीरी
कोरोना (कोवीड-१९) प्रादुर्भाव रोखण्याकरीता वापरण्यात येणाऱ्या “मास्क व हॅन्ड सॅनिटायझर’चा अत्यावश्यक वस्तुमध्ये समावेश केला आहे. सदर वस्तुंचा काळाबाजार होणार नाही, तसेच नागरीकांची गैरसोय होपार नाही याची दक्षता घेण्याबाबत प्रशासनाचे निर्देश आहेत. या वस्तुंची साठेबाजी करणाऱ्यांवर
कारवाई करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे.
दिनांक ०८/०४/२०२० रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुअवि, कक्ष३ चे पोलीस निरीक्षक नितीन पाटील व पोलीस शिपाई भास्कर गायकवाड यांना एक इसम कोरोना (कोवीड-१९) रोगाच्या सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेवून सर्जिकल मास्क चा साठा करून जास्त किंमतीला विकत असल्याची माहीती मिळाली होती.
मिळालेल्या माहीतीची शहानिशा करून शिधावाटप अधिकारी यांचेसह “तहा इंटरनॅशनल, एमएमएल, ६ सी, पहिला माळा, देवीदयाल कम्पाऊंड, दारुखाना रे रोड, मुंबई येथे याठिकाणी छापा टाकला असता मूर्तझा अब्दुल तय्यब अत्तारी, वय ३६ वर्षे हा ” N95 मारक व ३ प्लाय सर्जिकल मास्क” बाबत शासनाच्या अधिसुचनेप्रमाणे कोणताही परवाना नसताना बेकायदेशीररित्या साठेबाजी करुन काळया बाजारात विकत असल्याचे आढळून आले.
सदर ठिकाणाहून एकूण ६३,९५० नग ” N95 मास्क” किंमत रु,
१,२७,९०,000/- आणि ३१,000 नग ” ३ प्लाय सर्जिकल मास्क” किंमत रु.७,७५,000/-अशी एकूण किंमत रु.१,३५,६५,000/- ची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
” N95 मास्क व ३ प्लाय सर्जिकल मास्क’ चा कोरोना (कोवीड-१९) चा प्रसार रोखण्याकरीता नागरीकांना पुरेसा पुरवठा होणे आवश्यक असताना साठेबाजी करुन जास्त दराने काळया बाजारात विकी केली म्हणून शिधावाटप अधिकारी यांच्या फिर्यादीवरुन शिवडी पोलीस ठाणे, मुंबई येथे विशेष स्थागुरक,
०७/२०२० कलम ३,७,८,९ अत्यावश्यक वस्तूंचा कायदा १९५५ सह ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नमूद गुव्हयाची स्था.ग.र.क.१७/२०२० अन्वये गुन्हे शाखेच्या पटलावर पुन:नोंद करण्यात आली असून गुन्हे शाखा, कक्ष ३, ना.म.जोशी मार्ग, मुंबई यांचेमार्फत तपास
चालू आहे.
सदरची कामगिरी सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संतोष रस्तोगी, पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) श्री.शहाजी उमाप, सहाय्यक पो.आयुक्त,प्रकटीकरण-मध्य श्री.शशांक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, कक्षा ३ चे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक खोत, पोनि नितीन पाटील, सपोनि गजानन भारती, सपोनि सोनाली भारते, पोउनि मोहसिन पठाण, पोउनि नवनाथ उघडे, पोउनि राजेंद्र बागल, पोह गणेश
गोरेगांवकर, सुधीर पालांडे, पो.ना. आकाश मांगले, संजय नागवेकर, विनायक जाधव, संजय शेळके, पोशि भास्कर गायकवाड, प्रमोद सकपाळ, वैभव बिडवे, चंद्रकांत काळे, चंद्रकांत गोडसे, यांनी केली आहे.






