Amalner

Amalner: अवाजवी वसुली संदर्भात विक्रेत्यांची न प वर धाड..!

Amalner: अवाजवी वसुली संदर्भात विक्रेत्यांची न प वर धाड..!

अमळनेर येथील नगरपरिषद तथा ठेकेदारांकडून करण्यात येणारी अवाजवी वसुली थांबवायच्या. मागणीसाठी मीना बाजार, कटलरी व किरकोळ विक्रेत्यांनी पालिकेत जावून अधिकाऱ्यांसमोर समस्या मांडली.

यात्रे निमित्त नदीपात्रात जागा मिळण्यासाठी पालिकेला भाडे भरावे लागते. मात्र पालिकेने ठेका दिल्याने ठेकेदार अवाजवी वसुली करत आहेत. त्या पावतीवर नाव व शिक्का नाही. पैसे न दिल्यास मारहाण करू आणि माल जप्त करू अशी धमकी दिली जात असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला. फी कमी करत नाही तोपर्यंत दुकाने बंद ठेवू अशी भूमिका दुकानदारांनी घेतली. यात्रेत सतत दोन दिवस महिलांना खरेदी करता आली नाही. पो. ना.शरद पाटील यांनी व्यापाऱ्यांची समजुत घातली. मुख्याधिकारी सरोदे यांनी लक्ष घालण्याची मागणी दुकानदारांनी केली होती. सर्व किरकोळ व्यापारी पालिकेत आले पण मुख्याधिकारी प्रशांत सरोदे अनुपस्थित असल्याने त्यांच्या वतीने प्रशासन अधिकारी संजय चौधरी व वसुली विभागाचे महेश जोशी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

पूर्वी 50 रुपये आमच्या कडून घेतले जायचे आता 100 रुपये घ्या मात्र अवाजवी वाढ करू नका अशी मागणी सर्वांनी केली यावर चौधरी यांनी मुख्याधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढू कुणाचेही नुकसान होणार नाही याची ग्वाही दिल्यानंतर व्यापारी माघारी फिरले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button