?मोठी बातमी.. किरण बेदी यांना उपराज्यपाल पदावरून हटविले, ‘ ही ‘ आहेत प्रमुख करणे
नवी दिल्ली- केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुचेरीमध्ये चार आमदारांनी दिलेला राजीनामा आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने विधानसभेमध्ये काँग्रेस नेते व्ही. नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बहुमत गमावले आहे. यातच आता किरण बेदी यांना पुडुचेरीच्या उपराज्यपाल पदावरून हटविण्यात आले आहे.
दरम्यान,तेलंगणाच्या राज्यपाल टी. सुंदरराजन यांच्याकडे पुडुचेरीची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.पुडुचेरीच्या नायब राज्यपालपदी नव्या व्यक्तीची नियुक्ती होईपर्यंत सुंदरराजन यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे माध्यम सचिव अजयकुमार सिंह यांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेदी यांना हटवण्यामागे सर्वात मोठे कारण म्हणजे आगामी विधानसभा निवडणुका हे आहे. पुडुचेरीमधील कॉंग्रेस सरकारला किरण बेदी यांनी समांतर सरकार चालविण्याचा आरोप बेदी यांच्यावर करण्यात आला होता.हा मुद्दा भाजपसाठी चांगलाच अडचणींचा ठरला असता असाही अंदाज वर्तविण्यात येत आहे.
लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या दैनंदिन कामात हस्तक्षेप केल्याचा आरोप करून त्यांना काढून टाकण्याची मागणी देखील कॉंग्रेसने केली होती. बेदी यांचा कारभार भाजपसाठी काहीसा अडचणीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे म्हणूनच पदावरून हटविण्यात आले असे सांगण्यात आहे.
याशिवाय याठिकाणी विधानसभा बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचीही शक्यता आहे. अशा परिस्थितीत किरण बेदी तिथे असताना निवडणुका घेणे योग्य नसल्याचे लक्षात आल्याने देखील त्यांना हटविण्यात आले अशी चर्चा आहे.






