Jalgaon

? Crime Diary..जळगावात माजी महापौर अशोक सपकाळेंच्या मुलाचा खून.. मध्यरात्री चा जळगावात थरार…

? Crime Diary..जळगावात माजी महापौर अशोक सपकाळेंच्या मुलाचा खून..मध्यरात्री चा जळगावात थरार…

रजनीकांत पाटील

जळगाव प्रतिनिधी माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश (वय २८, रा. शिवाजीनगर) याचा अज्ञात तरुणांनी खून केल्याची घटना बुधवारी रात्री ११.३० वाजता शिवाजीनगरातील स्मशानभूमीजवळ घडली. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राकेश सपकाळे व त्याच्या लहान भावाचे काही दिवसांपूर्वी शनिपेठेतील तरुणांशी भांडण झाले होते. तेव्हापासून या दोन्ही गटात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, बुधवारी रात्री ११.३० वाजता राकेश हा स्मशानभूमी परिसरातून येत असताना दोन अज्ञात तरुणांनी त्याला अडवले. या तरुणांनी सुरुवातीला त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

? Crime Diary..जळगावात माजी महापौर अशोक सपकाळेंच्या मुलाचा खून.. मध्यरात्री चा जळगावात थरार...

यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या एका धावत्या ट्रकसमोर ढकलले होते. या ट्रकचा फटका राकेशच्या डोक्याला बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. यानंतर मारेकऱ्यांनी चाकूने राकेशच्या गळ्यावर, मांडीवर सपासप वार करुन घटनास्थळाहून पळ काढला. गंभीर जखमी झालेल्या राकेशचा काही वेळातच मृत्यू झाला.

दरम्यान, काही मिनिटातच ही घटना संपूर्ण शिवाजीनगरात पसरली. माजी महापौर अशोक सपकाळेंसह कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेत राकेश याला खासगी रुग्णालयात दाखल केले. तपासणी करुन डॉक्टरांनी राकेश याला मृत घोषित केले.

दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पुरावे गोळा केले आहेत. तर मारेकरी मात्र, पळून गेले. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

दोन दुचाकी जप्त :

घटनास्थळावर राकेशची मोपेड व आणखी एक दुचाकी पडून होती. मारेकऱ्यांनी स्वत:ची दुचाकीही घटनास्थळी सोडून पळाल्याची माहिती समोर आली असून या दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

या गँगने मारल्याची चर्चा

राकेश व त्याच्या लहान भावाचे दसऱ्याच्या दिवशी शनिपेठेत राहणाऱ्या आकाश, भुऱ्या व किरण सपकाळे (पूर्ण नाव माहित नाही) या तरुणांसोबत भांडण झाले होते. या दोन्ही तरुणांच्या गँगने राकेश याचा खून केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button