आरोग्याचा मुलमंत्र…तोंडाचा येणारा वास… त्यासाठी टिप्स खास…
आपण कितीही स्मार्ट किंवा सुंदर दिसत असलात तरीही जर तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर लोक केवळ आपल्यापासून अंतरच ठेवणार नाहीत तर आपल्याशी बोलण्यासही तयार होणार नाहीत. आपल्यापैकी बर्याच जणांना असे वाटत असेल की हे ब्रश न केल्यामुळे किंवा हिरड्यां संबंधित समस्यांमुळे होत असेल. पण हे कारण पूर्णपणे बरोबर नाही. होय, हिरड्यांशी संबंधित समस्या देखील एक कारण असू शकते पण हे एकमेव कारण नाही
दुर्गंध येण्याची कारणे काय आहेत.?
बरेच लोक या समस्येने ग्रासलेले आहेत. तोंडाला वास येण्याची अनेक कारणे आहेत. वेळेवर ब्रश न करणे, जास्त मसालेदार आहार असणे, कांदा, लसूनचा जेवणात अति वापर, दारु पिणे तसेच तंबाखू आणि गुटखा असे पदार्थ चघळणे अशा अनेक कारणांमुळे तोंडातून घाण वास येऊ शकतो. तोंडाला वास येण्याचं आणखी एक महत्वाचं कारण अपचन हे देखील असू शकतं. या समस्येपासून सुटका करण शक्य आहे. या समस्येवर काही घरगुती उपया करता येतील. तोंडाचा येणारा घाण वास घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय.
1. तुळशीची पानेघरोघरी दारात असणाऱ्या तुळशीचे औषधी गुणधर्म घरा-घरांत माहिती आहेत. तुळशीची पाने तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. तुळशीची पाने चघळून खाल्याने तोंडाला येणारा घाण वास येणे बंद होते. त्यासोबतच तुळशी तोंडात आलेल्या अल्सरसारख्या समस्याही दूर करते.
2. बडीशोपसाधरणतः बडीशोप आपण जेवण झाल्यानंतर खातो. बडीशोपला माऊथ फ्रेशनर म्हणून खाल्ले जाते. बडिशोप देखील तोंडाचा वास घालवण्यासाठी परिणामकारक आहे.
3. पेरुची पानेपेरु हा आरोग्यासाठी खूपच गुणकारी असतो, एवढेच नाही तर पेरुची पाने देखील शरिरासाठी फायदेशीर असतात, त्यांचा वापर अनेक रोगांच्या उपचारासाठी देखील वापर केला जातो. पेरुची कोवळी पाने चघळणे तोंडाला येणारा घाण वास घालवण्यासाठी उपयोगी ठरु शकते.
4. लवंगलवंग तोंडात ठेवल्याने देखील तोंडातली दुर्गंधी घालवता येते. इतकेच नाही तर लवंग ही दात दुखत असेल तर त्यावर उपाय म्हणून वापरता येते. दात दुखी आणि तोंडाला घाण वास येणे या दोन्ही समस्यांवर लवंग हा रामबाण उपाय सांगितला जातो.
डॉ किशोर बाळासाहेब झुटे
होमिओपॅथिक तज्ञ






