Maharashtra

?️ ठोस प्रहार विशेष…कामगार दिनानिमत्त… लॉक डावून आणि थांबलेला कामगार…

?️ ठोस प्रहार विशेष…लॉक डावून आणि थांबलेला कामगार….

प्रा जयश्री दाभाडे

सध्या संपूर्ण भारतात कोरोना विषाणू च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉक डावून सुरू आहे.या लॉक डावूनमुळे अनेकांचे जीवन थांबले आहे. विशेषतः मजूर, कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात बाधित झाला आहे.आज एक मे कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिवस… थांबलेला मजूर आणि कामगार यांचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणारे लाखो हात थांबले आहेत. असा प्रसंग आणि बाणी नंतर कधीच आला नव्हता. आणि आज असा प्रसंग आहे की कामगार दिनानिमत्त कामगार उपाशी आहे. संपूर्ण भारतात लाखो करखाने, मिल,दुकाने, उद्योग, व्यापार, कंपनी गेल्या दिड महिन्याा पासून बंद आहे. त्यामुळे वरील सर्व क्षेत्रांत कार्यरत असलेले मजूर, कामगार उपाशी पोटी आहेत. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत सामान्य माणसाला पडली आहे.

कामगार दिन कसा सुरू झाला?
औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला परंतु त्यांची पिळवणूकही होत होती. कोणत्याही सुविधा न देता अल्प मजुरीच्या बदल्यास १२ ते १४ तास राबवून घेतले जात होते. याविरोधात कामगार एकत्र आले व कामगार संघटनांनी निर्मिती झाली. प्रत्येक कामगाराला केवळ ८ तास काम असावे, असा ठराव घेतला. परंतु उद्योजक जुमानत नसल्याने मोठे आंदोलन उभारण्यात आले. त्यानंतर कामगार संघटनांची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली व १८९१पासून १ मे हा कामगारदिन पाळण्यात येतो.

भारतातील पहिला कामगार दिन..
भारतातील पहिला कामगार दिन तत्कालीन मद्रास शहरात १ मे १९२३ रोजी पाळण्यात आला. लेबर किसान पार्टी हिंदुस्थान या संघटनेने हा दिवस पाळला होता. याच दिवशी भारतात सर्वप्रमथ लाल बावटा वापरण्यात आला. कामगार नेते सिंगरवेलू चेत्तीअर यांनी कामगार दिन कार्यक्रमाच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. मद्रास उच्च न्यायालयासमोरील जागेत हा दिवस साजरा झाला होता.

आंतरराष्ट्रीय कामगार दिन
देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो. या दिवशी जगातील ८0 देशांमध्ये सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात येते. कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कामगार संघटना तसेच उद्योजक व सरकारतर्फे उत्कृष्ट कार्य करणार्‍या कामगारांचा गौरव करण्यात येतो.

ज्या दिवशी कामगारांच्या हक्कां साठी मोठी लढाई लढली गेली होती.य दिवशी सुट्टी जाहीर केली जाते. आज मात्र सुट्टी नको असे म्हणायची वेळ कामगारांवर आली आहे. कारण गेल्या दीड महिन्यापासून थांबलेले हात च नाही तर थांबलेले पोट अन्न आणि मजुरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था कशी होईल याची काळजी लागून राहिली आहे. त्यामुळे कामगार दिनाच्या शुभेच्छा तरी कश्या द्याव्यात असाही प्रश्न आज निर्माण झाला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button