sawada

?️ Big Breaking..त्या तांदूळ विक्री गैर प्रकरणाला व्हिडिओ पुराव्याने मिळाली अखेर पुष्टी…

Big Breaking

त्या तांदूळ विक्री गैर प्रकणाला व्हिडिओ पुराव्याने मिळाली अखेर पुष्टी

सावदा प्रतिनिधी युसूफ शाह

अॅगलो उर्दू हाय सावदा ता रावेर जि जळगाव या शाळेची शालेय पोषण आहाराचे जवळपास 12 ते 15 क्विंटलतांदूळ विक्री गैर प्रकणाची चौकशी दि 7/5/2020 रोजी करण्यात आली.जे संबंधित अधिकारी यांनी चाळीस दिवस चौकशीस टाळंम टाळ करण्याची भुमिका घेतली , व अचानक पणे त्यांनीच शाळेत येऊन त्यांना हवी असलेली चौकशी केली व त्यांच्या पद्धती ने प्रकरण गुंडाळण्याचा केवील वाणा प्रयत्न करून शाळा संबंधितांचे लंगु लाचन केल्याचे समजते .परंतु तक्रारदार यांनी रावेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व सभापती यांची पुन्हा समक्ष भेट घेऊन चौकशीवर संशय घेतला व चौकशी संबंधि पुरावे दाखवून अपुरी असल्या चे सांगितले आहे.

कलाटनी

” तक्रार दार यांचे म्हणणे ऐकून रावेर पंचायत समितीचे सभापती जितेंद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यालयात संबंधित अधिकाय्रांना बोलावून ह्या तांदूळ विक्री गैर प्रकणाची चौकशी संदर्भात योग्यतो कारवाई करण्याचे सांगितले.तसेच या प्रकरणाची दिशा चुकवणारे अधिकारी व शाळा संबंधितांवर कारवाई चे संकेत समजते. ”

एकीकडे
सदरील शाळेचे तथाकथित व्हाईस चेअरमन अक्रम खान अमानुलला खान
हे व्हिडिओ मध्ये असे बोलतांना दिसत आहे कि
खोट्या बातम्या वर विश्वास ठेवू नये. आम्ही प्लास्टिकच्या पिशवीत तांदूळ वाटप केले आहे…..व तक्रार दार यांचे वर कायदेशीर कारवाई बाबत ही इशारा दिला आहे.
पंरतु शाळेत टीन च्या कोठया उपलब्ध असतांना , आज पावेतो परत न केलेले सरकारी कंदान उपलब्ध असतांना
या ऐवजी मोठ्या प्रमाणात फैजपूर व अंबड साखर कारखान्याच्या प्लास्टिकच्या गोन्या मध्ये शा.पो.आहाराचे तांदूळ कशे ? व कोण आणि कधी आणले ? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शाळा कर्मचारी ने दिलेल्या उत्तराचे व्हिडिओ आपल्या समक्ष लवकरच येईल.

दुसरी कडे दुसर्या व्हिडीओ मध्ये उघडपणे
अॅगलो उर्दू हाय सावदा ता. रावेर जि जळगांव या शाळेचे कर्मचारी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरात असे म्हणत आहे कि

प्रश्न:- गुडडू मेम्बर ने दिया क्या?
उत्तर (शाळा कर्मचारी):- हा

प्रश्न:- कितने? लिया था उसने दस ना?
उत्तर (शाळा कर्मचारी):- नऊ

प्रश्न:- नऊ क्विंटल
उत्तर (शाळा कर्मचारी):- हा

प्रश्न:- ये जो भेजा गुडडू मेम्बर के ही है ?
उत्तर (शाळा कर्मचारी):- हां

तसेच व्हिडिओ मध्ये शाळेच्या वर्ग खोली मध्ये साखरेच्या प्लास्टिकच्या मोठ्या प्रमाणात ठेवलेल्या तांदूळ पोतळयां सुध्दा दिसतआहे.
या मुळे शाळेत झालेल्या तांदूळ विक्री गैर प्रकणाची सत्यता सिध्द होते
सदरील व्हिडिओ व फोटो दि 07/05/2020 रोजी चाळीस दिवसा नंतर चौकशी साठी आलेले अधिक्षकांना पुराव्यानिशी दिलेले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button