Ausa

औसा येथे आप पक्षाची तालुकास्तरीय कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न.. जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

औसा येथे आप पक्षाची तालुकास्तरीय कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न..

जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांच्यासह जिल्हा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

औसा प्रतिनिधी
आम आदमी पक्ष हा औसा तालुका परिसरात निवडनूकाभिमूख काम करण्यास तयार व्हावा व कार्यकर्त्यांनी संघटन वाढीच्या कामासाठी स्वतःला वाहून घ्यावे या मुद्याला घेऊन औसा शहरातील शासकीय विश्रामगृहात तालुकास्तरीय कार्यकर्ता संवाद बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आजपर्यंतच्या कामाचा आढावा दिला व संघटन बांधणीच्या पुढील योजनाची अमंलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांनी केल्या.यावेळी या बैठकीत आप लातूर जिल्हा सचिव दिपक कानेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुमित दिक्षीत,माजी युवा राज्य प्रवक्ता विक्रांत शंके यांच्यासह अँड अनिल मोरे,मुखतार मणियार,दगडु माने, अली कुरेशी,हुसेन मुजावर,आजम शेख,अतीक शेख,बाबर शेख,मुजोबोद्दीन शेख,मुजम्मील शेख, हाफीज पठाण आदिची उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button