शिवजयंतीचा उत्सव रावेर तालुक्यात मोठ्या जल्लोषात साजरा…
ता.रावेर , विलास ताठे रावेर तालुका प्रतिनिधी.
महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या संख्येने शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा रावेर यांच्या मार्फत मोटारसायकल रॅली काढण्यात आली,
ठिकाणी महिलांनी, युवा नेते, तरुण कार्यकर्ते, यांनी,शाळा,गारमपंचायत, वार्ड, वाड्या वस्त्या मध्ये शिवराय यांना अभिवादन केले, मिरवणूक वाजत-गाजत काढण्यात आली , तसेच अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर व्याख्यान, मार्गदर्शन पर प्रबोधन किर्तनकार यांचे कार्यक्रमाचे आयोजन केले,तर मोठ्या संख्येने विविध गावांमध्ये, रावेर शहरातील ठिकठिकाणी मोठमोठे शिवजयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा बनर,फलक लावण्यात आले होते, तसेच
रावेर येथील रेल्वे स्टेशन परीसरातील भोर गावात सर्वधर्मीय महिलांच्या समुदयाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा मध्यरात्री बसविला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने पुतळा हटवू नये म्हणून पहाटे साडेतीन वाजेपासून पूतळ्यासमोरच महिलांनी ठिय्या मांडला आहे.
यांच बातमी ची सर्व रावेर तालुक्यातील जनतेसाठी उत्कंठावर्धक विषय ठरला ..
याचप्रमाणे, रावेर शहरात जिजाऊ नगर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत संजीव देखावा मिरवणूक काढण्यात आली, यावेळी काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ,व समस्त रावेर शिवप्रेमी हे मिरवणुकीत सहभागी झाले होते,
रावेर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
रावेर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस नगराध्यक्ष दारामोहम्मद जफर मोहम्मद,यांनी पुष्पहार अर्पण केले तर उद्योजक श्रीराम पाटील व माजी नगराध्यक्ष हरीष गणवानी यांनी दिप व धुप पुजा केले. या वेळी उपस्थितानी अभिवादन केले.
यावेळी कागमार नेते दिलीप कांबळे तालुका भुमीअभिलेख अधिकारी राजु घेटे, ,ॲङ एम.ए.खान,मा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नगरसेवक जगदीश घेटे, श्रीराम फाऊडेशनचे सचिव दिपक नगरे, डॉ. ताराचंद सावळे, डॉ. गुलाबराव पाटील,अजबराव पाटील, विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी.
कॉग्रेसचे राजुभाऊ सवर्णे,हिरालाल सोनवणे,दशरथ घेटे,अशोक घेटे,विकास सवर्णे,एल.डी. निकम साहेब, सोपान पाटील,राजेरघुनाथ देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष अशोक शींदे, फुले,शाहु, आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे,प्रा. सी.एस.पाटील,पत्रकार संतोष कोसोदे, अशोक घेटे, श्रीराम आटोचे संतोष महाजन, अनिल घेटे,यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचाल व आभार ग्रंथपाल निलेश तायडे यांनी यानी मानले.
तसेच
रावेर येथे फुले,शाहू,आंबेडकर वाचनालयात लोकराजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हि रावेर फुले,शाहू,आंबेडकर सार्वनिक वाचनालय व ग्रंथालयात ज्यांच्या विचारांवर जगणारा माणूस आयुष्यात कधीच कुणाची गुलामगिरी करु शकत नाही. असे, स्वराज्य निर्माते, बहुजन प्रतिपालक,कल्याणकारी राजे, कुळवाडीभुषण विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्याच्या प्रतिमेस उद्योजक श्रीराम पाटील,यांनी पुष्पहार अर्पण केले तर नगरसेवक जगदीश घेटे व कागमार नेते दिलीप कांबळे यांनी दिप व धुप पुजा केले. या वेळी उपस्थितानी अभिवादन केले.
यावेळी तालुका भुमीअभिलेख अधिकारी राजु घेटे,श्रीराम फाऊडेशनचे सचिव दिपक नगरे,भारिप ता.अध्यक्ष बाळु शितरतुरे,मा.नगरसेवक ॲड.योगेश गजरे, पंकजभाऊ वाघ,फुले,शाहु,आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, एल.डी. निकम साहेब,राजेरघुनाथ देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष अशोक शिंदे, प्रा. सी.एस.पाटील,पत्रकार संतोष कोसोदे,धनराज घेटे,महेश तायडे,अशोक घेटे, नितीन तायडे, लक्ष्मण पाटील,श्रीराम आटोचे संतोष महाजन, राहुल राणे,भुषण महाजन,सतोष गाढेसर, किशोर महाजन,संतोष पाटील, मुकेश महाजन, नंदु महाजन,मिलींद महाजन, लक्ष्मण पाटील,जितु महाजन, मुख्याध्यापक रविंद्र तायडे,विजय अवसरमल,बाळु तायडे,, अशोक घेटे,सुधीर सैगमिरे, अनिल घेटे,संजय तायडे, सदाशिव निकम, यांचेसह मोठया प्रमाणात वाचक वर्ग उपस्थित होता.
यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जितेंद्र ढिवरे यांनी तर आभार अमर पारधे, यानी मानले.






