पद्मालय येथुन गणेश दर्शन करून सोनबर्डी येथे परत जणारे भाविकांचे ट्रॅक्टर व ऑटो रिक्षा यांच्या अपघातात २५ ते ३० जखमी.
प्रतिनिधी विक्की खोकरे.
एरंडोल – श्रावण सोमवार व संकष्ट चतुर्थी निमित्त श्री क्षेत्र पद्मालय येथे भरलेल्या यात्रे निमित्त गणेश दर्शन करून सोनबर्डी येथे परत जाणारे भाविकांचे tractore व एरंडोल कडून पद्मालयकडे जाणारी पियाजो क्रमांक एम.एच.19 – व्ही. 7263 या दोन्ही वाहनांमध्ये बूमटे शेता नजीक वळणावर दुपारी तिन वाजुन दहा मिनिटांच्या सुमारास अपघात होऊन जवळपास २५ ते ३० भाविक जखमी झाले.पैकी सात ते आठ गंभीर जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोचार करून जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.या दुर्घटनेतील काही भाविक बेशुद्धावस्थेत तर काही जखमी अवस्थेत परिसरात फेकले गेल्यामुळे त्यांचे आप्तेष्ट आक्रोश करीत त्यांना शोधत होते.उपस्थित सर्वच जण मदतीसाठी आरोळ्या मारीत होते.तसेच tractore ट्रोली मधील gas शेगडी,सिलिंडर,भांडे,पाण्याचा कॅन आदी वस्तु इतस्त; पसरल्या होत्या.बहुतांश जखमी हे सोनबर्डी गावातील होते.सदर घटनेचे वृत्त गावात कळताच गावक-यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की दर वर्षी श्रावण सोमवारी श्री क्षेत्र पद्मालय येथे यात्रोत्सव आयोजित केला जातो.या निमित सोनबर्डी येथील भाविकांची पायी दिंडी पद्मालय येथे गेली असता त्या ठिकाणी देवदर्शन आटोपल्या नंतर भोजनाचा कार्यक्रम झाला.त्यानंतर घराकडे tractore ने परत जात असतांना पद्मालय पासुन सुमारे सहा किलो मीटर अंतरावरील वळणावर एरंडोल कडून पियाजोएम.एच.१९ एएक्स ३७३२ रिक्षा येत होती.या दोन्ही वाहनांमध्ये अपघात होऊन tractore ची ट्रोली पियाजो रिक्षावर पलटी झाली.त्यात जवळपास २५ ते ३० भाविक जखमी झाली.
जखमींची नावे खालील प्रमाणे.सुरेखा नितीन पाटील (वय २८),मंगल विकास पाटील(वय १०),जिजाबाई सुभाष पाटील (वय ६५),निलेश धर्मा पाटील (वय१६),निलेश भरत पाटील (वय१५),सपना राजेंद्र कसारे (वय१७),अविनाश बालू शिंदे (वय१६),चेतन विनोद पाटील (वय१०),भरत लोखंडे (वय४५),उषाबाई लोखंडे (वय४३),मालुबाई बुधा पाटील (वय६०),कावेरी ज्ञानेश्वर पाटील (वय ७),गायत्री ज्ञानेश्वर पाटील (वय ९ ),अजय भरत लोखंडे (वय१४),दीक्षा दिपक पाटील (१८),शालिक वामन पाटील (६८),किरण संतोष पाटील (१६),रमाकांत पाटील (वय १९), अनिल श्रीराम मोरे (वय २२),निखील प्रविण पाटील (वय १६),प्रविण पाटील (वय २२),अक्षय शिंदे (वय २०),रिक्षा चालक सुरेश वंजारी (वय ४९) राहणार एरंडोल ,राजेंद्र पाटील (वय ५२) सर्व राहणार सोनबर्डी. ग्रामीण रुग्णालयात डॉ.राहुल वाघ,डॉ.किरण पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.कैलास पाटीलया डॉक्टरांनी वैद्यकीय उपचार केले







