Amalner: तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे बक्षीस वितरण संपन्न..!
तारीख 30 ऑगस्ट 2022 विज्ञान प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी श्री साई कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय देवगाव देवळी येथे बक्षीस वितरण हे ताईसो स्मिता वाघ माजी आमदार विधान परिषद यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस सभापती श्यामजी आहे रे तसेच संस्थेचे अध्यक्ष श्री प्रकाश हनुमंत पाटील भटू पाटील श्री बाविस्कर संस्थेच्या सचिव सौ रत्नमाला कुवर सरस्वती आयटीआयचे सर्व स्टाफ आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते एकूण 94 प्रकल्पांपैकी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल असा
सहावी ते आठवी विद्यार्थी गट:- प्रथम- दिपाली पाटील, विशाखा पाटील (गणित प्रतिमा, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पळासदडे),
द्वितीय- ऋग्वेद शिंदे, हर्षदा पाटील (सस्टेनेबल एग्रीकल्चर अँड इको फ्रेंडली मटेरियल, ऍड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल अमळनेर),
तृतीय सागर पाटील (आर्मी कंटोनंट, श्री बी बी ठाकरे माध्यमिक विद्यालय वावडे) उत्तेजनार्थ- अश्विनी पाटील (स्वच्छता व आरोग्य, साने गुरुजी कन्या विद्यालय अमळनेर), रोहित पाटील, टिळक पाटील (सोलर रस्ते, स्व. श्रीराम गबाजीराव सोनवणे विद्यालय भरवस)
नववी ते बारावी विद्यार्थी गट:- प्रथम- साहिल पिंजारी, कुणाल पाटील (गणितीय मॉडल, बालाजी विद्यालय गांधली- पिळोदे)
द्वितीय- यश चौधरी, अजिंक्य सोनवणे (स्वयंचलित पथदिवे, साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय अमळनेर), तृतीयतन्वी सोनार (रेल्वे वाहतूक यंत्रणा, डी आर कन्या शाळा अमळनेर),
उत्तेजनार्थ- दुर्गेश देसले, यदेश बडगुजर, कृष्णा पवार (मेडिसिन क्यूआर कोड एन टी मुंदडा ग्लोबल व्ह्यू स्कूल अमळनेर), मयूर पाटील, पुष्पराज पाटील (रेन वॉटर हार्वेस्टिंग नूतन माध्यमिक विद्यामंदिर रुंधाटी-मठगव्हाण) माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक गट:- प्रथम एस एस बोरसे (शालेय अॅप, किसान माध्यमिक विद्यालय जानवे),
द्वितीय- प्रमिला रमेश अडकमोल (गणितीय उपकरण, पंडित नेहरू माध्यमिक विद्यालय, फापोरे), तृतीय – प्रदीप सोनवणे (धमाका बंदूक, माध्यमिक विद्यालय, ढेकू) उच्च प्राथमिक
शिक्षक गट:- प्रथम- ज्ञानेश्वर कुवर (खेळातून आरोग्य व स्वच्छता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळोद उमेश पाटील प्राथमिक विद्यालय अमळनेर)






