सावदा येथे गौसियानगर सह विविध भागात नागरिक नवीन गटारी, रस्त्यांचे काम सुरू होण्याची बघत आहे वाट : भूमिपूजनाला महिना उलटला तरीही पालिकेला मुहूर्त सापडेना
सावदा प्रतिनिधी युसूफ शाह
सावदा :- जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात असलेल्या सावदा शहरात न.पा. हद्दीत समाविष्ट झालेले गौसिया नगर, ताजुशशरिया नगर, मदिना नगर इत्यादी भागात जवळपास गेल्या पंधरा वर्षांपासून गटारी व रस्त्यांची मोठी समस्या होती दर पावसाळ्यात येथील रहिवासी नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तारेवरची कसरत करावी लागत होती सदर भागातील सर्वत्र ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचलेला असतो त्यामुळे दुर्गंधीयुक्त साचलेल्या पाण्यात वादळी वाऱ्यामुळे आलेल्या घानकचऱ्यातून विषारी डांस, मच्छरांचा विविध प्रकारचे किडे कट कुल यांची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत होती नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता या गंभीर समस्यांला येथील रहिवाशांना सतत तोंड द्यावे लागत होते यासंदर्भात वेळोवेळी येथील नागरिकांनी सामूहिक रित्या पालिका प्रशासन सह राष्ट्रवादीचे विरोधी गटनेते व नगरसेवक फिरोज खान पठाण, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राजेश वानखेडे, यांच्याकडे समस्या चा निवारण करण्यासाठी मागणी केलेल्या होत्या व आहे.
सदरील सर्व विभागाची समस्या कायमची संपवण्या करिता सतत पंधरा वर्षापासून राष्ट्रवादीचे हरहुन्नरी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी कागदोपत्री पाठपुरावा केल्याने सदरील सर्व भागांत दिनांक १८ जुन २०२१ रोजी नवीन रस्ते व गटारी करिता भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. या कामात माजी नगराध्यक्ष राष्ट्रवादी चे सावदा येथील जेष्ठ नेते राजेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान अपक्ष नगरसेवक राजेंद्र श्रीकांत चौधरी,तसेच नगरसेविका नंदाताई लोखंडे व सध्या पालिकेत लाभलेले मुख्याधिकारी श्री सौरभ जोशी यांनी सहकार्य केले याबाबत येथील परिसरातील नागरिकांनी आनंदी होऊन त्यांचे आभार मानले होते.
मात्र भूमिपूजन कार्यक्रमास एक महिन्याचा कालावधी उलटूनही सदरील भागात नवीन गटारी रस्त्यांचे काम आजपावेतो सुरू करण्यात आलेले नाही म्हणून गौसिया नगर, ताजुशशरिया नगर, मदिना नगर इत्यादी भागांत पावसाळ्याचे दिवस असल्याने सर्वत्र ठिकाणी पाणी साचून चिखलमय परिस्थिती असल्याने पंधरा वर्षापूर्वी प्रमाणे आजही जैसे थे ची समस्या कायम असल्याने त्रस्त नागरिकांत मोठ्या प्रमाणात संतापाची लहर उसळलेली आहे.
या कार्यक्रमात प्रोटोकॉल अनुसार सत्ताधारी व विरोधी सह अपक्ष नगरसेवक व नगरसेविकांच्या उपस्थित सावदा शहराची प्रथम नागरिक म्हणून भाजपाची लोकनियुक्त नगराध्यक्षा आनिता पंकज येवले यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात भुमीपुजन करण्यात आले त्यावेळी नागरिकांना असे वाटले की आज भूमिपूजन आणि उद्यापासून नवीन गटारी व रस्त्यांचे काम सुरू होऊन आपणास १५ वर्षपासून होणारा त्रास आत्ता कायमचा संपुष्टात येईल सबब त्यावेळी मोठ्या आनंदाने उत्सुक होऊन येथील नागरिकांनी नगराध्यक्षा अनिता येवले सह सत्ताधारी गटाचे नगरसेवक नगरसेविकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कारही केला पालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांचे सुद्धा त्यावेळीआभार मानले होते. या भूमिपूजन कार्यक्रमाचा गाजावाजा ज्याप्रमाणे एका महिन्यापूर्वी जलद गतीने फोटोसेशन द्वारे फेसबुक, व्हाट्सअप, वृत्तपत्रात करण्यात आला त्याच धर्तीवर गौसिया नगर सह विविध विभागांचे नागरिकांची समस्या कायमची संपवण्या करिता संवेदनशीलता जिद्द पालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी, सत्ताधारी गटांनी दाखवलेली दिसत नाही तसेच पालिकेतील विरोधी गटाचे नगरसेवक जनतेच्या कामा करीता धावपळ करतांना दिसतात मात्र उपयोग काय? म्हणून….चे आमंत्रण जेवल्यावर खरे अशी स्थिती येथील नागरिकांवर आली आहेत.






