पाडळसे तालुका यावल येथे कोरोना युद्धांना माक्स हॅन्ड ग्लोज व फेस कवर ग्रामपंचायत तर्फे वाटप
सलीम पिंजारी
फैजपूर येथून जवळच असलेल्या पाडळसे तालुका यावल येथे कोरोना योध्दाना ग्रामपंचायत तर्फे मास्क, हॅन्ड ग्लोज व फेस कवर चे वाटप.
पाडळसे ता-यावल वार्ताहर येथे ग्रामपंचायत यांच्या कडून गावातील कोरोना योध्दा सफाई कर्मचारी’आशा वर्कर, अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रा.प.कर्मचारी हे घरोघरी जाऊन गावातील ग्रामस्थांचे दररोज शरीराचे तापमान(थर्मल स्कँनिंग व पल्स ओस्किमिटर) साहाय्याने तपासणी करत आहेत व सफाई कर्मचारी सुध्दा दररोज सफाई करत आहेत यांच्या आरोग्याचा विचार करुन सर्वं कोरोना योध्दा साहित्याचे वाटप सरपंच ज्ञानदेव दांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रा.विकास अधिकारी लिलाधर नहाले,पो.पा.सुरेश खैरनार,ग्रा.प.सदस्य खेमचंद कोळी, ज्ञानेश्वर तायडे ,कोतवाल प्रविण बोरनारे अंगणवाडी सेवीका सुरेखा चौधरी आशावर्कर प्रगती पाटील.उपस्थीत होते.






