Rawer

पुणे निवासी चिनावलकर यांचा प्रथम स्नेहमेळावा संपन्न

पुणे निवासी चिनावलकर यांचा प्रथम स्नेहमेळावा संपन्न

विलास ताठे

दि:- ९ फेब्रुवारी २०२० या रोजी पुणे निवासी चिनावलकर यांचा प्रथम स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या कार्यक्रमासाठि तरूण मंडळीने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. तसेच या कार्यक्रमात प्राध्यापक श्री हेमचंद्र सोनजी भिरूड व चिनावल शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री बी. टी. बेंडाळे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच लहान मुलांनी गायन व नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जितेंद्र सिताराम भारंबे व स्वाती वायकोळे यांनी पार पाडले.
कार्यक्रम उत्कृष्टपणे पार पाडण्यासाठी भुषण वायकोळे, भुषण कोल्हे, पंकज कोळंबे, हर्षल पाटील, चंद्रकांत बोंडे, चिराग भंगाळे, राकेश भंगाळे, तुषार कोल्हे, तुषार गाजरे. यांचे विशेष सहकार्य लाभले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button