Maharashtra

पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई…राजकीय आशीर्वादामुळे फोफावत आहेत अवैध धंदे??

पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई…राजकीय आशीर्वादामुळे फोफावत आहेत अवैध धंदे??

पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई...राजकीय आशीर्वादामुळे फोफावत आहेत अवैध धंदे??
 
अमळनेर :- नूतन पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांनी गेल्या पाच दिवसातच अवैध धंद्यावर धडक कारवाई केली आहे. शहराला लागूनच असलेला बनावट दारूचा कारखाना त्यांनी  उध्दवस्त  केला. दोन दिवसात लाखाचा गांजा व गुटखा पकडला.

पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांची अवैध धंद्यावर धडक कारवाई...राजकीय आशीर्वादामुळे फोफावत आहेत अवैध धंदे??
     फार पूर्वीपासून  अमळनेर शहराला सामाजिक,
शैक्षणिक,धार्मिक ,सांस्कृतिक वारसा आहे.एके काळी शिक्षणाची पंढरी, सांस्कृतिक आणि विद्येचे केंद्र म्हटल्या जाणाऱ्या अमळनेर शहराची ओळख आता बनावट,दारू,गुटखा, गांजा,अवैध धंदे, वाळू माफिया,कुंटणखाना, अवैध चालणाऱ्या शिकवण्या ,खून दरोडे इ गोष्टींसाठी ओळखले जात आहे. ही नवीन पिढीसाठी चिंतेची बाब असून तरुण महाविद्यालयीन वर्ग व्यसनाधीन होताना दिसत आहे.  अमळनेर तालुक्यात वरील सर्व अवैध धंदे मोकाट पणे सुरू असून मागे मोठ्या प्रमाणावर स्पिरीट पोलिस विभागाने पडकले होते. तालुक्यात स्पिरीट चा टँकर सापडतो म्हणजे त्यामागे कोणीतरी मोठी आसामी असण्याची शक्यता होती मात्र त्याविषयी नंतरच्या काळात शांतता बाळगली गेली. तालुक्यात अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू आहे. मात्र त्याकडे अर्थपूर्ण कानाडोळा केला जात असल्याचे आरोप अनेकांनी केले आहेत. हे सर्व अनेक दिवसापासून सुरू आहे मात्र त्याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. अधिकारी बदलताच अवैध धंदे सापडतात म्हणजे त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. बनावट दारूमुळे तालुक्यातील अनेकांचा जीव जात आहे. त्यामुळे पोलिस विभागाने ह्याची पाळेमुळे शोधून काढावीत, व त्यांना राजकीय आश्रयस्थान तर मिळत नाहीये ना हे जनतेसमोर उघड करावे अशी मागणी सुज्ञ नागरिक करत आहेत.
दोन दिवसात लाखाचा गांजा व गुटखा पकडला. त्यामुळे अमळनेर तालुक्याला एक कर्तव्यदक्ष अधिकारी लाभला आहे याची प्रचिती अमळनेरकराना आली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button