Maharashtra

Covid-19 च्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिक, समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांना तहसिलदार अंजली मरोड यांचे जाहीर आवाहन

Covid-19 च्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील सर्व नागरिक, समाजसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांना तहसिलदार अंजली मरोड यांचे जाहीर आवाहन

प्रतिनिधी कृष्णा यादव

अक्कलकोट, दि.07:- राज्यात पूर्ण विषाणू covid-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन यांच्याकडून साथीचे रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे तसेच कोरोना विषाणू covid-19 याचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासन यांच्याकडून राज्यात 14 एप्रिल 2020 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे राज्यामध्ये लागू करण्यात आलेल्या संचारबंदी चे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश देखील देण्यात आले आहेत. परंतु या सर्वांमध्ये जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक शिव सुरळीतपणे चालू राहतील याची दक्षता घेण्याबाबत करण्यात आलेले आहे. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब व्यक्ती, मजूर, गरजू व्यक्ती व गरजू कुटुंब यांचे हाल होऊ नये याकरिता अशा व्यक्तीं व कुटुंबांना तालुक्यातील सेवाभावी संस्था सामाजिक संस्था व दानशूर व्यक्ती यांच्याकडून अन्नधान्य स्वरूपात व भोजन स्वरूपात मदत केली जात असून या स्वरूपात केलेल्या जाणाऱ्या मदतीच्या वेळी लोकांची गर्दी होऊन संचारबंदी उल्लंघन होत असल्याचे व सोशल डिस्टिसिंग पाळले जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.
यास्तव तालुक्यातील सर्व नागरिक सेवाभावी संस्था व समाजसेवी संस्थांचे प्रमुख तसेच दानशूर व्यक्ती यांना आव्हान करण्यात येते की, आपणास गरीब व्यक्ती, मजूर, गरजू व्यक्ती व गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात मदत करावयाची असल्यास तसे अन्नधान्याचे किट तयार करून तहसील कार्यालय अक्कलकोट येथे जमा करण्यात यावेत. तसेच लोकांची गर्दी होऊ नये व सोशल डिस्ट्रिक्ट पाळली जावी याकरिता कोणीही परस्पर अन्नधान्य स्वरूपात मदत करावयाचा कार्यक्रम आयोजित करू नये, असे जाहिर आवाहन एका प्रसिद्धपत्रकाद्वारे अक्कलकोट तहसीलदार अंजली मरोड यांनी केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button