Rawer

सावदा येथे शिवजयंती उत्साहात साजरी…!

सावदा येथे शिवजयंती उत्साहात साजरी…!

विलास ताठे

सावदा (प्रतिनिधी)

तिथी नुसार शिवजयंती उत्सव सणांचे अवचित्य साधून त्या निमित्त आज दि १२ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी
महाराज यांचे पुतळ्याचे व ध्वजाचे पूजन सोमवरगिरी मढीचे महंत हिरागिरी महाराज याच्या हस्ते करण्यात आले.

सवाद्य मिरवणूक शहराचे प्रमुख मार्गावरून काढण्यात आली. प्रसंगी जय शिवाजी ,जय भवानी गगन चुभी घोषणांनी शहर दणाणून टाकले होते.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेश वानखेडे,नगरसेवक राजेंद्र चौधरी,नगरसेवक सिद्धार्थ बडगे,नगरसेविका मीनाक्षी कोल्हे,नगरसेविका रंजना भारंबे, मुक्ताईनगर डी वाय एस पी सुरेश जाधव ,सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ,माजी नगरसेवक चंद्रशेखर पाटील ,अभिवक्ता कालिदास ठाकूर,डॉ चंद्रशेखर पाटील, युवा सेना जिल्हा संघटक सुरज परदेशी,अनिल लोखंडे,भारत नेहते,शिवसेना शहर प्रमुख मिलिंद पाटील,माजी नगरसेवक लाला चौधरी,उपतालुका प्रमुख शाम पाटील,डिगा महाजन,नितीन महाजन,अभिजित मिटकर,मनीष भंगाळे,गौरव भेरवा,गजानन भार्गव,जे के भारंबे,गौरव भंगाळे,सागर पाटील, मनोज माळी, शरद भारंबे,राकेश बोराखडे, मंगेश माळी, अभय पाटील,अक्षय विनते,यांचे उपस्थितीत मिरवणूक सोमवार गिरी मढी चौक,स्वामीनारायन मंदिर,
मोठा आड, इंदिरागांधी चौक,चावडी चौक,चांदणी चौक,गांधी चौक,संभाजी चौक,शिवाजी चौक,वंजारी वाडी,सुभाष चौक मार्गे मिरवणूक सोमवरगिरी मढी येथे समारोप झाला मिरवणुकीत इंदिरा गांधी चौक शिवाजी चौक येथे सजावट करण्यात आली होती.

मुक्ताईनगर विभागाचे डी वाय एस पी सुरेश जाधव सावदा पोलीस ठाण्याचे स पो नि राहुल वाघ यांनी सहकारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button