Maharashtra

आमदार रोहित पवार यांचेकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी 500 लिटर सॅनिटायझर.

आमदार रोहित पवार यांचेकडून चंद्रपूर जिल्ह्यासाठी 500 लिटर सॅनिटायझर.

प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची गरज लक्षात घेवून ना. विजय वडेट्टीवार यांच्या विनंतीवरून कर्जत – जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यासाठी 500 लिटर सॅनिटायझर उपलब्ध करून दिले आहे.
आज सकाळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांचे उपस्थितीत सॅनिटायझर जिल्हा प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आले.

*राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात आमदार रोहित पवार यांच्याकडे विनंती केली होती.* कोरोना संदर्भात जिल्ह्यामध्ये एकही रुग्ण आढळू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य यंत्रणेकडून तपासणी अभियान सुरू करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन नागरिकांच्या आरोग्याची चौकशी प्रसंगी तपासणी करणाऱ्या संपूर्ण जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला याचा वाटप होणार आहे.
*आमदार रोहित पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.*

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार व जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी नंदू नागरकर, राजीव कक्कड, दिपक जयस्वाल, ज्योती रंगारी आदी उपस्थित होते.
*या सॅनिटायझरचे जिल्हयात वितरण होणार आहे.*

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button