आप्पासाहेब जगदाळे यांच्या कडुन गरजुंसाठी रेशन कीटचे वाटप.
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे:कोरोना व्हायरस मुळे अनेक गोरगरीब लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, यानिमित्ताने अनेक लोकांचे रोजगार गेले आहेत भारत देशांमध्ये लॉकडाऊन असल्याने नागरिकांना बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. यानिमित्ताने इंदापूर काटी मधील जे नागरिक रोज मोलमजुरी करतात व ज्याचे पोट हातावर अासणार्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करु शकत नाही अशा गरजू नागरिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. अाप्पासाहेब जगदाळे यांनी धान्य वाटप केले आहे,यामध्ये गहू, तांदूळ, साखर, मटकी बटाटा याचे वाटप गावातील प्रमुख व्यक्तीच्या हस्ते करण्यात आले आहे.
काटी येथे आप्पासाहेब जगदाळे यांच्या माध्यमातून गरजू नागरीकांना ज्याचे हातावरचे पोट आहे ज्यांना काम करून अापला प्रपंच करावा लागतो अशा गरीब जनतेला मदतीचा हात पुढे करून रेशन कीटचे वाटप केले. यावेळी प्रत्येक कुटुंबाला १ कीट देण्यात अाले यामध्ये गहू तांदूळ साखर मटकी व बटाटा याचे वाटप करण्यात आले. येथे एकूण १०० रेशन कीट अाल्या होत्या त्या हरिष शिवाजी वाघमोडे विठ्ठल तुकाराम शेंडे बापूराव वाघमोडे प्रकाश बलभिम वाघमोडे संतोष मल्हारी सोलंनकर नितिन भोसले यांनी प्रत्येक गोरगरीबांच्या घरोघरी जाऊन गर्दी होऊ नये म्हणुन घरपोच सेवा दिली. सर्व शासकीय नियम पाळून वाटप केले काटी मधील नागरिकांनी मा. अाप्पासाहेब जगदाळे यांचे आभार मानले यानिमित्ताने इंदापूर तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी समोर येऊन असे कार्यक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.






