शिरसोलीचे दोन गंभीर एक जखमी; रायसोनी कॉलेज जवळील घटना
प्रतिनिधी रजनीकांत पाटील
जळगाव शहरात एकीकडे कोरोनाने थैमान घातले असतांना दुसरीकडे अपघात सुध्दा वाढत आहे. आज सकाळी शिरसोली येथील तीन जण बांधकाम मजूर काम करण्यासाठी मोटारसायकलवरुन जाणाऱ्या तीन जणांना मारोती ओमनीने शिरसोली रोडवरील रायसोनी काँलेज जवळ समोरून जोरदार धडक दिली. यात दोन जण गंभीर तर एक जखमी झाले आहे. या तीघांना गोदावरी मेडिकल काँलेज येथे उपचारासाठी दाखल केले आहे.
मिळालेली माहिती अशी की, शिरसोली येथिल राहुल पाटील वय 25 , भुषण मिस्तरी वय 24 व सागर पाटील वय 25 सर्व राहणार शिरसोली येथिल अशोकनगर परिसरातील भोलेनाथ नगर व स्वामी समर्थ मंदिरा जवळील हे तीघे आज शिरसोली कडून सकाळी 7 वाजता जळगाव येथे बांधकाम करण्यासाठी मोटारसायकल क्र.MH-19 DK.9890 वरुन जात होते. जळगाव कडून शिरसोली कडे भरधाव येणाऱ्या ओमनी क्र. MH-19CF.3754 ने रायसोनी काँलेज जवळील घटाळती वर ओव्हरटेक च्या नादात जोरदार ठोकले यात राहुल पाटील,सागर पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर भुषण मिस्तर हा जखमी झाला आहे.
या तिघांना उपचारासाठी गोदावरी मेडिकल काँलेज येथे हलविले आहे. दोघे गंभीर जखमीची तब्येत चिंताजनक आहे. याबाबत पोलीसांत अध्याप कुठलेही नोद नाही. मारोती ओमनी ही जळगाव येथील पोपट कोल्हे यांच्या मालकीची असल्याचे आरटीओ येथिल आँनलाईन नोदणी नुसार कळते.






