Amalner

?Live.. रणधुमाळी ग्रामपंचायतीची..अमळनेर तालुक्यात 15 ग्राम पंचायत बिनविरोध..तर अंदाजे 59 माघार …

? Live..रणधुमाळी ग्रामपंचायतीची..अमळनेर तालुक्यात 15 ग्राम पंचायत बिनविरोध..तर 59 माघार …रात्री उशिरापर्यंत अर्ज छाननी सुरू…

अमळनेर येथे 67 ग्राम पंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. या अनुषंगाने आज माघार घेण्याची अंतिम तारीख असल्याने साने गुरुजी विद्यामंदिर येथे मोठ्या प्रमाणात तालुक्यातील लोकांनी गर्दी केली होती. आज रात्री उशिरापर्यंत ग्राम पंचायत निहाय माघारीचे अर्ज छाननी करण्याचे काम सुरू आहे. शेवटची बातमी हाती आली तेंव्हा अंदाजे 59 अर्ज 10 ते 15 ग्राम पंचायती तुन माघार झाले असल्याची माहिती मिळाली. तर एकूण 15 ग्राम पंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तसेच 62 व्यक्तिगत वॉर्ड निहाय बिनविरोध झाले असल्याची माहिती मिळाली.

अमळनेर तालुक्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे जवळपास 15 ग्राम पंचायती बिनविरोध घोषित झाल्या आहेत. यात आधीच्या 5 आणि आज माघारी नंतर 10 अश्या 15 ग्राम पंचायतींचा समावेश आहे. यात आधीच्या म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी भिलाली,एकतास,कुर्हे बु,जळोद,हिंगोणे बु ह्या 5 ग्राम पंचायत बिनविरोध घोषित करण्यात आल्या होत्या. तर आज अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 10 ग्राम पंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यात पिंपळे बु,शहापूर,टाकरखेडा,दापोरी,आटाळे, कलंबे,फापोरे धानोरे,देवगाव देवळी, बोदर्डे या ग्राम पंचायतीचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत ग्राम पंचायत निहाय अर्ज छाननीचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे अशी माहिती निवडणूक अधिकारी आणि तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आणि कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button