धार्मिक भावना दुखावल्याने वसीम रिजवी वर गुन्हा नोंद होऊन कार्यवाही बाबत शहर पोलिस ठाण्यात एम आई एम चे तक्रार निवेदन.
फहिम शेख नंदुरबार
नंदुरबार : एम आई एम चे पदाधिकाऱ्यांनी आज नंदुरबार शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार निवेदन दिले असुन सर्वजण नंदुरबारचे रहिवासी असुन सर्व लोक इस्लाम धर्माचे अनुयायी (मुस्लिम) आहत. दिनांक:- 11/03/2021 रोजी उत्तर प्रदेश राज्य शिया वक्फ बोर्डचा माजी अध्यक्ष, वसीम रिजवी रा. 349/13-अ, काश्मिरी मोहल्ला, सादात गंज, लखनऊ उत्तर प्रदेश, मो. क्र. 9005683000 याने मा. सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून इस्लाम धर्माची सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुरआन मध्ये बदल करून त्याच्यात असलेले आयातां मधुन 26 आयात वगळण्यात यावी अशी मागणी केली आहे, आम्हाला पुर्ण विश्वास आहे की, मा. सर्वोच्च न्यायालय हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 13 अन्वये सदर याचिका दाखल न करता फेटाळून लावतील, पण वसीम रिजवी ह्याने याचिका दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना त्याने सांगितले की, कुरआन हे आतंकवादची शिक्षा देतो, इस्लामचे सुरवातीचे तीन खलीफा यांनी ताकतीचा प्रयोग करून इस्लामचा प्रसार केला, कुरआन मुळे मुस्लिम युवक आतंकवादाकडे वळत आहे, वगैरे वैगरे, वसीम रिजवी याने दिलेले मीडिया बाईट हे सर्वत्र पसरले आहे व त्याचे बोलणे ऐकुन इस्लाम धर्म मानणारे मुस्लिम लोकांचे धार्मिक भावना तिव्र दुखावलेले आहेत तसेच अशी चुकीची माहिती प्रसार माध्यामांद्वारे देऊन इतर धर्माचे लोकांमध्ये अपप्रचार केल्यामुळे इस्लाम धर्म व मुस्लीमांबाबत इतर धर्मियांमध्ये तेढ निर्माण करण्याचा काम वसीम रिजवी ह्याने केलेला आहे. तरी वसीम रिजवी विरुद्ध आमची कायदेशीर तक्रार आहे की , त्याचे विरुद्ध भा. दं. वि. कलम 153, 295, व आय.टी अॅक्ट प्रमाणे त्वरीत गुन्हा दाखल होऊन कार्यवाही होऊन त्याला कडक शासन व्हावे. असे आशयाचे तक्रार निवेदन देण्यात आले असुन यावर पोलिस काय व केंह्वा कार्यवाही करतील याकडे सर्वांचे लक्ष राहील .
सदर तक्रारीत तक्रारदार म्हणुन
सैय्यद रफअत हुसैन सदाकत हुसैन
1. शोएब आसिफ खाटिक
2. अब्दाल औरंगजेब पठाण
3. डॉ. मतीन गफ्फार शेख
4. कमरअली मजहरअली सैय्यद
5. सैय्यद आरीफ सैय्यद हमीद
6. मुक्तार बेग इमाम बेग मिर्जा
7. फिरोज जाबाजखान बेलदार
8. मुजम्मिल हुसैन अर्शद हुसैन
9. अमीन खलील शेख
10. शरीफ सत्तार बागवान
11. तौसीफ अशरफ खान बेलदार यांचे नाव व सह्या आहेत.






