Nashik

मोबाईल नेटवर्क साठी रात्रदिवस काम करणारे कसमादे पट्ट्यातील नवयुवक ठरले सर्वसामान्य जनतेचे आकर्षण

मोबाईल नेटवर्क साठी रात्रदिवस काम करणारे कसमादे पट्ट्यातील नवयुवक ठरले सर्वसामान्य जनतेचे आकर्षण

महेश शिरोरे

कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी जगभरातील लोक घरात बंदीस्त असून संवाद साधत आहेत .अॉनलाईन पध्दतीने मुलांना घरात बसुन शिकणे सोपे झालेले असले. तरीही,लॉकडाउन च्या परिस्थितीत एकमेकांमधील संवाद कायम ठेवण्यासाठी त्याचबरोबर मुख्यमंत्री, अधिकारी लोकप्रतिनिधी याच्या व्हिडिओ कॉन्फरेन्स साठी व मनोरंजनात्मक कार्यक्रमांना बघण्यासाठीही मोठ्या इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अशा परिस्थितीत इंटरनेट सुरळीत चालावे यासाठी मोबाईल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना मात्र दिवसरात्र काम करावे लागत आहे.

धुळे शहरात जिओ कम्युनिकेशन चे मुख्य केंद्र असुन खान्देशातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये तसेच कसमादे मध्ये जिओ नेटवर्कलोकांपर्यंत पोहचवण्याचे काम प्रताप टेक्नोक्रॅट प्रायव्हेट लिमिटेड या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या वेंडर कंपनीच्या माध्यमातून करण्यात येत आहे .

सदर कामासाठी कर्मचारी केबलचा अथवा इंटरनेट संदर्भात कोणताही प्रश्न उद्भवल्यास रात्री – अपरात्री कर्तव्य बजावून लोकांना नेटवर्कची समस्या उद्भवू नये यासाठी कार्यरत आहेत . विशेषतः तरुण कर्मचारी कार्यरत असुन त्यांना कोरोनापासून बचावासाठी मास्क व ईतर साहीत्याचे वाटप करण्यात आले आहे. विविध क्षेत्रात कार्यरत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच मोबाईल नेटवर्क साठी सदर कर्मचारी आपले योगदान देत आहेत .

यासाठी सर्वसामान्य जनतेकडून कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी मदतही मिळत आहे व सर्व स्तरातून या कर्मचाऱ्यांचे कौतुक देखील होत आहेत . सर्वसामान्य लोकांकडून आमच्या कर्मचाऱ्यांचे होणारे कौतूक हे आमच्यासाठी प्रेरणादायी व ऊत्साह वाढवणारे आहे असे मत प्रताप टेक्नोक्रॅट टेलिकॉम अभियंता गणेश पवार व संदीप देवरे यांनी केले आहे .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button