Nashik

पिंपळगाव बसवंत आगार येथे सुरू असलेल्या बेमुदत संपास मनसेचा पाठिंबा..

पिंपळगाव बसवंत आगार येथे सुरू असलेल्या बेमुदत संपास मनसेचा पाठिंबा..

नाशिक शांताराम दुनबळे

नाशिक=महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळ चालक व वाहक यांनी बेमुदत पुकारलेल्या संप आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष
राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नाशिक जिल्हा मनसे नेते डॉ प्रदीप पवार ,प्रदेश सरचिटणीस अशोक भाऊ मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष रतनकुमार ईचंम, जिल्हा अध्यक्ष अंकुश भाऊ पवार यांच्या सूचनेवरून एस टी कर्मचारी यांच्या सुरू असलेल्या आंदोलनास मनसे चा जाहिर पाठिंबा देण्यात आला आहे
पिंपळगाव आगार तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे चालू असलेल्या एस टी कर्मचारी यांच्या बेमुदत संप आंदोलनास आज मनसे चे तालुकाध्यक्ष प्रकाश शेठ गोसावी, जिल्हा संघटक संजू मोरे , मनसे निफाड तालुकाध्यक्ष शैलेश दादा शेलार यांनी भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा पाठिंबा दिला. यावेळी मनसे तालुका सरचिटणीस अब्दुल शेख तालुका उपाध्यक्ष सतीश पाटील मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष सुयोगक गायकवाड विधानसभा अध्यक्ष गिरीश कसबे निलेश सोनवणे मनोज ठाकरे मनवीसे पिंपळगाव शहर अध्यक्ष नितिश झुटे ऋषीकेश कायस्थ आकाश काठे सुमित लाड गौरव मोरे कृष्णा हेलोटे बालनाथ निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते व महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button