Chimur

वीज कार्यालयावर भाजपचा हल्लाबोल आंदोलन खोटे आश्वासन देणाऱ्या तिघाडी सरकारच करायचे काय खालती डोकं वरती पाय! कोरोना काळातील वीज बिल माफ करा.. आमदार बंटीभाऊ भांगडीया

वीज कार्यालयावर भाजपचा हल्लाबोल आंदोलन खोटे आश्वासन देणाऱ्या तिघाडी सरकारच करायचे काय खालती डोकं वरती पाय! कोरोना काळातील वीज बिल माफ करा.. आमदार बंटीभाऊ भांगडीया

ज्ञानेश्वर जुमनाके चिमूर

चिमूर : मागील एक वर्षा पासून कोरोना मुळे देशातील कामे बंद होती उपासमार थांबविण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करीत असताना सर्वात जास्त महाराष्ट्र राज्याला मदत दिली असून चिमूर विधानसभा क्षेत्रातील ९०कोटीची विकास कामे महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली ,कुंभकर्ण राज्य सरकारला जागे करण्यासाठी हल्लाबोल आंदोलन आज चिमूर येथे वीज वितरण कंपनी कार्यालयावर केलेले असून थकीत बिल जनतेने भरणा करू नये कारण राज्य सरकारने 200 युनिट बिल माफ करण्याचे आश्वासन दिले होते परंतु हे तिघाडी सरकार असलेले राज्यशासन मात्र खोटे आश्वासन देत आहे असे आमदार बंटी भांगडीया यांनी हल्लाबोल करीत सर्व जनतेचे विजबिल माफ झालेच पाहिजे म्हणत कार्यालयास ताला ठोकला .

राज्यभर भाजपच्या वतीने वीज कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन / ताला ठोको आंदोलन करीत असताना आज दि५ शुक्रवारी चिमूर महावितरण कार्यालयावर भाजप चिमूर तालुका भाजपचे वतीने आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले असता याप्रसंगी ते बोलत होते .

भाजप जनसंपर्क कार्यालयापासून महाविकास आघाडी शासनाच्या खोट्या आश्वासन विरोधात वीज बिल माफ झालेच पाहिजे अश्या घोषणा देत महावितरण वीज कार्यालयावर मोर्चा नेत वीज कार्यालयास ताला ठोकण्यात आले .

यावेळी भाजप तालुका अध्यक्ष राजू पाटील झाडे, वसंत वारजुरकर डॉ श्यामजी हटवादे राजु देवतळे ,प्रकाश वाकडे बकारामजी मालोदे, समीर राचलवार महिला आघाडी तालुका अध्यक्ष माया ननावरे, शहर अध्यक्ष सचिन फरकाडे शहर महामंत्री सुरज नरुले शहर उपाध्यक्ष सचिन बघेल संजय कुंभारे रमेश कंचर्लावार माजी नगरसेविका भारती गोडे, विनोद चोखरे, नितीन गभणे माजी नगरसेवक छाया कंचर्लावार , मनीषा कावरे कल्याणी सातपुते नाजमा शेख, रत्नमाला मेश्राम नीता लांडगे ,ममता गायकवाड देवा मुंगले सतीश जाधव जयंत गौरकर ,दिगंबरराव खलोरे ,गुलाबराव मनमोकर ,प्रकाश बोकारे डॉ देवनाथ गंधारे प्रशांत चिडे ,चिंतामण नाकाडे विजय झाडे, बंटी वनकर ,मयूर कापसे गणेश शेंडे महादेव कोकोडे विलास कोराम प्रवीण गणोरकर ,विवेक कापसे अरुण लोहकरे, विकी कोरेकर , योगेश नाकाडे ,बाबा ननावरे ,अशोक कामडी, मनी रॉय ,राजू बोडणे, हरीश पिसे, लीलाधर बनसोड, अनिल शेंडे,कैलास धनोरे,देवा मालके ,सुधीर दंदे, शुभम भोपे ,निखिल भुते ,करण चावरे, अमित जुमडे ,संजय नवघडे, वामन बांगडे, श्रेयस लाखे ,गणेश मेहरकुरे, बबूखान, एकनाथ धोटे ,हंसराज श्रीरामे , वामन सालेकार ,कणीलाल नाकाडे, हिमांशू किरीमकर ,सावन गाडगे ,संदीप पिसे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते .

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button