Latur

लातूरचे नवे पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी पदभार स्वीकारला..

लातूरचे नवे पोलीस अधीक्षक पिंगळे यांनी पदभार स्वीकारला..

प्रतिनिधी/प्रशांत नेटके

लातूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून निखिल पिंगळे यांची दि १७ सप्टेंबर रोजी बदली झाली होती.
त्यांनी मंगळवार दि १३ ऑक्टोबर रोजी नवीन पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला.

लातूर जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेंद्र माने हे २ ऑगस्ट २०१८ रोजी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त झाले होते.
त्यांनी २ वर्ष २ महिने सेवा बजावली.
महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक,पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गुरुवार दि १७ सप्टेंबर रोजी बदल्या झाल्या होत्या.यात नागपूर येथील राज्य राखीव पोलिस बल,गट १३ चे समादेशक निखिल पिंगळे यांची लातूर जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली होती.

तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेंद्र माने यांच्याकडून नवे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारला आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button