“मांडुळ जातिचा साप पकडुन ठेवणार्या दोघांना अटक”
शांताराम दुनबळे
नाशिक-:मांडूळ जातीचे साप पकडून ठेवणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली असून त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता पाच दिवसांची फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे . याबाबत वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार येवला लुक्यातील सत्यगाव येथे राहणारा सोमनाथ रामनाथ पवार ( २३ ) रा.सत्यगाव व त्याचा एक साथीदार यांनी मांडूळ जातीचा साप पकडलेला असून त्याच्या राहत्या घरात मातीच्या रांजनात दडवून ठेवल्याची माहिती मिळाली होती . या माहितीच्या आधारे त्याच्या घरी धाड टाकली असता घरासमोरील एका रांजनात मांडूळ जातीचा सर्प मिळून आला यावेळी सर्प व दोन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले .
या आरोपींना ०२ जून रोजी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ०६ जून पर्यंत फॉरेस्ट कस्टडी देण्यात आली आहे . नाशिक येथील उपवनसंरक्षक तुषार चव्हाण , सहा . वनसंरक्षक सुनील नेवसे , सहा.वनसंरक्षक वनपरिक्षेत्र अधिकारी येवला संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली एम.बी. पवार , बनपाल येवला , प्रसाद पाटील , एन.एम. बिन्नर , विलास देशमुख यांनी या कारवाईत भाग घेतला याप्रकरणी वनविभाग पुढील तपास करत आहे.






