Chimur

केंद्र शासनाच्या निषेधार्थ तहसील कार्यालय चिमूर समोर एकदिवसीय धरने आंदोलन संपन्न

केंद्र शासनाच्या निषेधार्थ तहसील कार्यालय चिमूर समोर एकदिवसीय धरने आंदोलन संपन्न

चिमूर – प्रतिनिधी ज्ञानेश्वर जुमनाके

चिमूर : – केंद्र शासनाकडून गेल्या ६ महिन्यांपासून चिमुर तालुक्यातीलच नाही तर राज्यातील घरकुल लाभार्थीना निधी प्रात्प झाला नसल्याने युवक काँग्रेस चिमुर च्या वतीने तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन माजी जि.प.सदस्य तथा गटनेते सतिशभाऊ वारजुकर यांच्या नेतृवात प्रधानमंत्री आवास योजना ,रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना थकित निधी उपलब्ध करून देण्याबाबत , केंद्रसरकार तफै प्राप्त होत असणाऱ्या संजय गांधी निराधार योजनेची थकित रक्कम त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबत , घरकुल मंजूर लाभार्थ्यांना अतिक्रमनाचे तात्काळ पट्टे वाटप करण्याबाबत , केंद्रसरकार कडून शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबत चे निवेदन तहसीलदार यांना दिले. यावेळी भावना बावनकर , राणी थुटे , सविता चौधरी , पप्पू शेख , वनिता मगरे , विनोद रणदिवे , गौतम पाटील , विजय डाबरे , राजू पाटील , ओम खैरे , प्रशांत डवले , योगेश थुटे , व आदींची यावेळी उपस्थिती होती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button