Pandharpur

कोरोना चा सामना करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा- विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती

कोरोना चा सामना करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा- विवेक परदेशी आरोग्य समिती सभापती

रफिक अत्तार

पंढरपूर प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी कोरोना काय आहे. व्यक्ती आहे, कि वस्तु आहे, कि ठिकाण आहे आपणास माहित नव्हते. पण आत्ता आपणास कोरोना विषयी माहिती मिळत आहे. कोरोना हा किती मोठा संकट आहे हे कळत आहे. तरि बरेच नागरिक हवी तेवढी काळजी घेत नसताना दिसत आहे. पण नागरिक कोरोना विषयी चांगले,वाईट माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचाच परिणाम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या जनता कफ्यु ला नागरिकांकढुन चांगला प्रतीसात मिळाला.
कोरोना हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो. तो हवेतुन प्रवाहित होत नाही हि खुप चांगली गोष्ट आहे. परदेशातील नागरिकांकडून तो आपल्या नागरिकांकडे आला. आपल्या नागरिकांकडुन तो आता गुणाकार स्वरुपात अनेक पटीत पसरत असल्याने किंवा पसरण्याचा धोका असल्याने आपल्या शासनाने परदेशातील विमान प्रवास बंध केला.आपणास माहिती मिळत आहे कि देशातील शहरांचा (डोमेस्टिक) विमान प्रवास बंध केला आहे, रेल्वे प्रवास बंध केला आहे ,बस सेवा बंद केल्या आहेत, एका जिल्हातुन दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणारे प्रवास रोखणार असल्याचे सांगितले जात आहे. यांचे कारण हेच आहे की आपणास बाहेरच्या देशातुन आलेला या वायरस ला थांबवायचे आहे, त्याला हरवायचे आहे. गुणाकार पध्दतीने वाढणा-या या वायरस ला रोखण्यासाठी ज्या नागरिकांमध्ये मध्ये कोरोना आजाराचे लक्षणं आहेत त्यांना औषध उपचार करुन त्यांची सुटका करणे खुप महत्वाचे आहे, त्याचाच परिणाम आपण या वायरस ला मोठ्या पटित वाढु न देता रोखू शकतो. बरेच नागरिक या आजारापासून बरे होत असल्याचा ही आपण पाहत आहे. मि आरोग्य समिती, नगरपरिषद पंढरपूर च्या वतीने आपणास आव्हान करतो कि आपल्या संपर्कातील परिवारातील किंवा परिचयातील असणारे कोणत्याही व्यक्तीस खोकला,ताप(टेंपरेचर) कोरोनाची लक्षण आढळली तर आशा व्यक्तीची किंवा स्वतः ला अशी लक्षणे असतील तर याची माहिती नगरपरिषद प्रशासाना द्या. यामुळे आरोग्य विभागाला व शासनाला आपत कालीन यंत्रना राबवणे सोपे होईल. योग्य वेळी, योग्य उपचार मिळाले नागरिक बरे होतात अशी माहिती आपणास मिळत आहे . कोणाच्या हि घरी जाऊन भेटने टाळा, फोन वर बोला, वेळ प्रंसंगी विडीओ कॉल करा, कोणी आपणास आपल्या त्यांच्या सुरक्षेसाठी घरात येण्यास मनाई केली , कोराना संकट टळेल परियंन्त वाईट वाटुन घेऊ नका, सहकार्य करा. बाहेर गावातुन आलेल्या नागरिकांनी किंवा नागरिकांच्या परिवारांतील सदस्यांनी नगरपरिषद प्रशासनाला कळवायचे आहे किंवा नगरपरिषदेला ऑनलाईन फॉर्म भरुन कळवायच आहे. थोडे दिवस बाहेन गेले नाही तर काही होणार नाही, पण कोरोना जर आपल्या घरात शिरला तर गंभीर संकट येईल. पुढील काही दिवस शासन सांगे परियंन्त घरा बाहेर पडू नका. शक्यतो किरणांना , जिवनावश्यक वस्तु फोन वर ऑडर देऊन घर पोच घ्या. बरेच दुकानदारांनी जिवनावश्यक वस्तु घरपोच देणार्यांचे ठरवले आहे. गर्दी न करता शक्य असेल त्यांनी रक्तदान करा. पुणे , मुंबई , पिंपरी-चिंचवड, ईतर जिल्ह्यातुन किंवा परदेशातुन , आपल्या भागात, नागरिक आले असतील तर , त्या नागरिकांची माहिती नगरपरिषदेला कळवणे आवश्यक आहे. त्याचा आधार घेऊन आपण त्या नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहोत , त्या नागरिकांनी १४ दिवस त्याच घरात परिवारापासुन सुरक्षीत अंतर ठेऊन वावरणे महत्त्वाचे आहे.१४ दिवस त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणे तीतकेच महत्वाचे आहे त्यानंतर प्रकृती चांगली असेल तर त्यांना त्यांचे परिवार किंवा मात्र परिवारात वावरण्याच्या सुचना दिल्या जातील. या नागरिकांना काही झाले असेल असे नाही पण एक काळजी म्हणुन*कोरोनो वायरस ला आपल्या भागातुन नष्ट करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. जर आपण वाईट शक्यता विचारात घेतली व पर जिल्हातुन आलेल्या आपली व्यक्ती कोरोना मुळे आजारी पडले तर कोरोना मल्टिपल पटीत वाढेल. कुंटुबीयांना व इतर नागरिकांना धोका होऊ शकतो. त्यामुळे कोरोना विरुद्ध चे युध्य जिंकण्यासाठी नागरिक सहभाग महत्त्वाचा आहे. नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. कोरोना होणे काही वाईट नाही. त्या व्यक्ती ची चुक नाही तो कुणाच्यातरी संपर्कात आल्यामुळे त्याला त्याची लागण झाली. नागरिकांच्या सहभागातून योग्य वेळी निदान झाल्यामुळे, त्या व्यक्तीस उपचार देऊन त्यालाही वाचवता येईल व त्या वायरस चा गुणाकार होणार नाही , पुर्ण परिवार व सर्व नागरिक सुरक्षीत राहील. आपण जरी नाही कळवले आपले शेजारील लोक खुप जागरुक झाले आहेत. त्यांनी कळवण्या आधी, कोणताही संकोच मनात न बाळगता आपण बाहेरील जिल्ह्यातुन आलेल्या आपल्या नातेवाईक, मुला ,मुलींची नोंद ऑनलाईन खालील लिंक वर किंवा टोल फ्रि नंबर 18002331923 वर कळवावे. पंढरपूर तालुकासाठी 02186-223556 या नंबरवर संपर्क करावा त्यांच्यासाठी निच्छित आरोग्य विभागाचे मदत राहिल , मार्गदर्शन राहिल. योग्य मदत व मार्गदर्शन मिळाल्यानंतर नागरिकांची मोहिम सफल होईल.
कोरोना झालेल्या व्यक्तीला कोणी वाईट वागणूक देऊ नका असे प्रशासन सांगत आहे. जर कुणी त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कारवाई होऊ शकते , तपासणी नंतर ते निगेटिव्ह हि असु शकतात. प्रत्येक ग्रामपंचायत नगरपरिषद, महानगरपालिका साठी हेल्पलाईन नंबर आहेत. परगावावरुन आलेल्या किंवा आजारी व्यक्तीची माहिती त्वरित कळवुन, आरोग्य विभागाला व शासनाला आपत कालीन यंत्रना यशस्वीपणे राबवण्यासाठी सहकार्य करावे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button