जामनेर

सुभाष बिंदवाल यांना ग्रीन मँन अवार्ड…..

सुभाष बिंदवाल यांना “ग्रीन मँन अवार्ड”

सुभाष बिंदवाल यांना ग्रीन मँन अवार्ड.....

रांजणी ता जामनेर वार्ताहर                    
    महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती व  हरियाअली  ट्रस्ट शहादा जिल्हा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन करून पर्यावरणाचे राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी वृक्षारोपण मोहीम, पाणी आडवा, पाणी जिरवा , जलसंधारण तसेच  एक गाव – एक होळी , प्रदूषणमुक्त दिवाळी, जलपरिषद , आदी अभियान यशस्वीपणे राबविले आहेत .पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यावरणप्रेमीचा गुणगौरव करणे ,पशु पक्षांची जोपासना करण्यासाठी वृक्ष बचाव रँली,शेतकरी मेळावा, जलपरिषद ,पर्यावरण बचाव रँली अशा विविध उपक्रमाच्या  माध्यमातून सर्व सामान्य जनतेला पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमात सामील करून पर्यावरणीय जन चळवळ निर्माण करून पर्यावरणवाद्यांना प्रेरणा म्हणून निसर्ग मित्र समिती व हरियाअली  ट्रस्ट शहादा यांच्या सयुंक्त विद्यमाने राज्यस्तरीय पर्यावरण परिषदेचे आयोजन दिं१३सप्टेंबर शुक्रवार रोजी धुळे येथे आय एम ऐ सभागृहात  करण्यात आले. या परिषदेत पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे दै देशदूत चे पत्रकार तथा आदर्श शेतकरी सुभाष यादव बिंदवाल  यांना शॉल, मृती चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष डी एफ ओ धुळे श्री शेळगे साहेब हे होते तर प्रमुख अतिथी  नेहरू युवा केंद्राचे संचालक अतुल निकम औरंगाबाद येथिल वाल्मी संस्थेचे प्रा.बाळासाहेब शेटे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे , माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुभाष बोरसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मनिष पवार , प्राचार्य.पी.व्ही.रसाळ आदी  निसर्ग-मित्र समितीचे संस्थापक प्रेमकुमार अहिरे, हरियाअली ट्रस्टचे अध्यक्ष हैदरअली नुरानी, प्रदेश अध्यक्ष डी.आर.पाटील, प्रदेश सचिव संतोषराव पाटील, धुळे जिल्हाध्यक्ष डी.बी.पाटील, नाशिक जिल्हा अध्यक्ष नानासाहेब पाटील,नाशिकजिल्हा सचिव सयाजीराव पगार ,जळगाव जिल्हाध्यक्ष अँड विलासराव झाल्टे,औरंगाबाद  जिल्हाध्यक्ष लक्ष्मण साळुंखे, धुळे जिल्हा कार्याध्यक्ष मंगलदास जगन्नाथ पाटील, धुळे जिल्हा सचिव विश्वासराव पगार ,प्रदेश संपर्क प्रमुख एम.आर.जाधव, जिल्हा उपाध्यक्ष एस.आर.पाटील, प्रदेश संघटक आत्माराम सोनवणे , डॉ.विनोद भागवत , प्राचार्य .भिकाजी देवरे , मालेगाव तालुका अध्यक्ष प्रा.दिपक देशमुख,पारोळा तालुका अध्यक्ष प्रेमचंद अहिरराव ,धुळे शहरअध्यक्ष एच.ए.पाटील ,साक्री तालुका अध्यक्ष गोकुळ पाटील,नरेश माळी , राकेश जाधव , धुळे तालुका अध्यक्ष उमाकांत पाटील, शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर.आर.सोनवणे आदीनी कार्यक्रम यशस्वीते साठी परीश्रम घेतले..

Leave a Reply

Back to top button