Nashik

शेतमाल खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा—-स्वाभिमानी रिपाई शंशिकात जगताप यांची मागणी

नवीन पीक कर्ज मिळण्याची आशा धूसर..

शेतमाल खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घ्यावा—-स्वाभिमानी रिपाई शंशिकात जगताप यांची मागणी

शांताराम दुनबळे

नाशिक-:नाशिक जिल्ह्यात व येवला तालुक्यात खरिपचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांकडे शेतमाल पडून आहे. हा माल खरेदीसाठी नियोजन करणे गरजेचे आहे. लाँकडाऊनमधील संकटाच्या काळात शेतकऱ्यांना शासनाने वाऱ्यावर सोडू नये,अशी अपेक्षा शेतकरी नेते व स्वाभिमानी रिपाई नेते शंशिकात जगताप यांनी व्यक्त केली आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकानूसार खरीप तोंडावर असताना अद्याप ही शेतकऱ्याकडे शेतमाल पडून आहे. हा माल कुठे विकावा व पुढील खरीपाचे नियोजन कसे करावे, या चिंतेने शेतकरी त्रस्त आहे. कोरोनाने सर्वञ थैमान घातल्याने प्रत्येक मानूस एकमेकांकडे संशयाने पाहत आहे. काही व्यक्ती या परिस्थितीचा लाभ घेवून आपली पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत आहे. असे काही जण कृत्रिम महागाई निमार्ण करून शेतकरी व सामान्य नागरिकांना कैचित पकडत आहे. यातून लूटण्याचा प्रकार सुरु आहे. ही स्थिती कोरोनापेक्षा भंयकर आहे. यावर शासकीय यंत्रनेने अंकूक्ष लावने गरजेचे असताना प्रशासकीय यंत्रना मुग गिळून असल्याची खंत शंशिकातां जगताप यांनी व्यक्त केली आहे.

व्यापाऱ्यांकडून बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता ही त्यानी व्यक्त केली. प्रत्यक्षत कृषी विभागाने दक्षता घेण्याची गरज आहे. सध्या शेतकऱ्यांकडे ३०ते ४०टक्के कापूस, सोयाबीन, तूर,हरबरा, गहू पडून आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे बाजार व्यवस्था चौपट झाली. सीसीआयने काही ठिकाणी कापूस खरेदीकरिता आँनलाईन नोंदणी केली. आता मात्र त्यात सात बारात कापूस पेरा तपासणी व एबिसीडीप्रमाणे कापूस बाजार समितीत येत आहे. मात्र ही खरेदी लांबणार आहे. त्याचे चूकारे कधी मिळतील, खरिपची तयारी कशी करावी, या विवंचनेत शेतकरी बांधव आहे. त्यामुळे तातडीने शेतमाल खरेदीसाठी बाजार समितीने पुढाकार घेतण्याची अपेक्षाही व्यक्त केली धान्य खरेदीत तेच धोरण आहे. हमालांचा असहकार दर्शवून खरेदी बंद पाडायची व व्यापाऱ्यांनी नंतर शेतकऱ्यांकडून पडलेल्या भावात मालाची थेट खरेदी करायची, असा गोरखधंदा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे. यावरही शासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत ही जगताप यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button