Amalner

?️ अमळनेर कट्टा… जलसंपदा मंत्री जयंत पाटील अमळनेर दौऱ्यावर, पाडळसरे धरणाची करणार पाहणी व बैठक..

?️ अमळनेर कट्टा… जलसंपदा मंत्री जयंत पाटील अमळनेर दौऱ्यावर, पाडळसरे धरणाची करणार पाहणी व बैठक..

अमळनेर : राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पाडळसरे धरणावर 11 फेब्रुवारी रोजी येत असुन ते धरणाची सद्यस्थितीची पाहणी करणार आहेत.
यावेळी तापी खोरे विकास महामंडळासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक देखील घेणार आहेत व धरणाबाबत चर्चा करणार आहेत. सकाळी पावणे अकरा वाजता जलसंपदामंत्री यांचे पाडळसरे येथे आगमन होणार आहे. त्यानंतर धरणावरच अमळनेर विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार असून यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील.
त्यानंतर पाडळसरे येथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम होईल. त्यानंतर पाडळसरे येथून अमळनेर येथे प्रयाण होईल. सव्वा दोन ते तीन हा वेळ राखीव राहील. अमळनेर येथून पारोळा कडे रवाना पारोळा येथे आगमन. याठिकाणी एरंडोल मतदार संघाची आढावा बैठक होईल. त्यानंतर पारोळा येथून पाचोरा येथे रवाना होतील. त्याठिकाणी पाचोरा मतदार संघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक होईल. त्यानंतर जामनेर येथे आगमन त्याठिकाणी जामनेर मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाची आढावा बैठक त्यानंतर जळगाव येथे रवाना होतील. त्यानंतर आगमन आणि राखीव मुक्काम अभिषेक पाटील यांच्याकडे मुक्काम राहील.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button