खिर्डी खु.येथील नवीन गावठाण परीसरात पाणी चे टाकी व्हॉल दुरुस्त करणे ची ग्रामस्थांची मागणी
खिर्डी प्रतिनिधी:- भिमराव कोचुरे
रावेर तालक्यातील खिर्डी खु.येथील नवीन गावठाण गट नंबर १२१ क मध्ये गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सन २००० मध्ये पाण्या ची टाकी बांधण्यात आलेली असून सदरील ठिकाणी व्हाल ला पाणी गळती सुरू असल्याने हजारो लिटर पाणी मात्र वाया जात असून सदर ठिकाणी पाण्या मुळे डबके तयार झाल्याने तेथे डासांची उत्पत्ती होत असून गावा मध्ये साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. पाण्या मुळे वाढलेल्या गवता वर फवारणी करावी पंचायत प्रशासना च्या ढिसाळ नियोजनामुळे तात्काळ कारवाई करण्यात येत नाही तरी लवकरात लवकर व्हाल दुरुस्त करावा अशी ओरड ग्रामस्थां कडून होत आहे.






